आळेफाटा पोलिसां कडून रक्तदान शिबिराचे आयोजन

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी

२५ जानेवारी २०२२

आळेफाटा


येथील आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे आणि जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आळेफाटा पोलीस स्टेशन व रोटरी क्लब यांच्या सहकार्यातून दि.26 जानेवारी रोजी भारत भवन कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आहे. आळेफाटा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष आणि दबंग अधिकारी म्हणून काही दिवसातच ओळख निर्माण करणारे पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर यांनी कोरोना काळातील रुग्णांना होत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन या रक्तदान शिबिराचे आयोजन केल्यामुळे कुठेतरी रुग्णांना हातभार लागावा हा आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे .त्याच प्रमाणे समाजातील विविध घटकांमधील सदस्यांनी रक्तदान करून सहकार्य करण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे, रागिणी कराळे, राजेश पवार यांनी केले आहे.