हिवरे खुर्द येथे ज्ञानज्योती महिला ग्रामसंघाचे कार्यालय सुरु

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी 
१९ जानेवारी २०२२

ओतूर


जुन्नर तालुक्यातील मंगळवार दि.१८ रोजी ओतूर पिंपरी पेंढार जिल्हा परिषद गटामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अभियान पंचायत समिती जुन्नर अंतर्गत ग्रामपंचायत हिवरे खुर्द येथे ज्ञानज्योती महिला ग्राम संघाच्या कार्यालय आज सुरु करण्यात आले आहे. हिवरे खुर्द गावामध्ये उमेद अभियान पंचायत समिती अंतर्गत एकूण ११ समूहांची /गटांची स्थापना करण्यात आली, असून या सर्व गटांचे खेळते भांडवलाचे प्रस्ताव तालुकास्तरावर सादर करण्यात आले आहेत या ११ गटांपैकी २ गटांना रुपये २ लाखांचे बँक कर्ज मिळाले असून, ७ गटांचे रुपये ८ लाखांचे कर्ज बँकेने मंजूर केले आहे.

हिवरे खुर्द या गावामधील अकरा गटातील १४० महिला उमेद अभियाना मध्ये समाविष्ट झालेल्या असून स्थापन झालेल्या गटांचे कामकाज दशसुत्री प्रमाणे चाललेले दिसून येत आहे.यावेळी उमेद अभियान पंचायत समितीचे प्रभाग समन्वयक रविंद्र आल्हाट, गावच्या सरपंच मनीष बर्डे, उपसरपंच लक्ष्मण वायकर ग्रामसेविका सीमा खोकले, संगणक परिचालक राजश्री येंधे, ज्ञानज्योती महिला ग्राम संघाच्या अध्यक्ष पुनम पांडुरंग वायकर, सचिव पुनम भूषण वायकर ,कोषाध्यक्ष मंगल सूर्यवंशी, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री वायकर उपस्थित होत्या.तर अश्विनी वायकर, शुभांगी वायकर, रुचिता अंभुरे ,पुनम वायकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *