शिंदेवाडीत शोकाकुल वातावरणात जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

रामदास सांगळे
विभागीय संपादक
१८ जानेवारी २०२२ 

बेल्हे


शिंदेवाडी (ता.जुन्नर) येथील शशिकांत पोपट शिंदे (वय-३८) या जवानाचा अपघाती मृत्यू झाल्याने जुन्नर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.जम्मू काश्मीर मध्ये भारतीय आर्मी सेवेत असणारे वीर जवान शशिकांत शिंदे सुट्टीवरून गावी परतत असताना रेल्वेमध्ये त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाला. त्यांच्यावर शिंदेवाडी येथे मंगळवार (दि.१८) रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जुन्नर तहसीलदार,सर्व प्रशासकीय अधिकारी,जुन्नर तालुका माजी सैनिक संघटना,आळेफाटा पोलीस उपस्थित होते.पोलिसांनी या वीर जवानाला मानवंदना दिली. त्यांनी २० वर्ष देश सेवा केली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी प्रगती, मुलगा वेदांत (वय-१२ वर्ष) व दुसरा मुलगा प्रतीक तसेच आई-वडील, भाऊ असा त्यांचा परिवार आहे.

शेतकरी व गरीब कुटुंबतील या जवानाच्या मृत्यूने शिंदे कुटुंबावर शोककळा पसरली असून सर्वत्र दुःखाचं वातावरण आहे. अंत्यविधी वेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते. या कुटुंबाला धीर देण्यासाठी परिसरातील अनेक मान्यवर हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. या वीर जवानावर गावात शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करते वेळी ‘अमर रहे,अमर रहे, वीर जवान अमर रहे’ भारत माता की जय, वंदे मातरम, अशा घोषणाने परिसर दुमदुमला होता.या जवानाच अंत्यदर्शन घेण्यासाठी परिसरातील हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. या वीर जवानाच्या मृतमुळे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *