कोरोना काळात मयत झालेल्या २६ कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख रुपयांच्या धनादेशाचे महापौरांच्या हस्ते वाटप

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१८ जानेवारी २०२२ 

पिंपरी


कोरोना कालावधीमध्ये मयत झालेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबियांच्या दु:खामध्ये महानगरपालिका सहभागी असल्याचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोरोना विषाणूमुळे मयत झालेल्या कर्मचा-यांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख रकमेचा धनादेश महापौर माई ढोरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते. यावेळी २६ महापालिका मयत कर्मचा-यांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख याप्रमाणे ६ कोटी ५० लाख रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले.  त्याचा तपशील खाली दिलेल्या यादी प्रमाणे आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *