जम्बों कोविड सेंटर व मंचर उपजिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षातील डॉक्टर,परिचारिका यांचे पुढील तीन महिन्याचे मानधन विविध संस्थेच्या माध्यमातून देणार- शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१७ जानेवारी २०२२

आंबेगाव


अवसरी खुर्द (ता.आंबेगाव)येथील शिवनेरी जम्बो कोविड सेंटर आणि मंचर उपजिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षातील पुढील तीन महिन्यासाठी संस्थेच्या माध्यमातून सर्व वैद्यकीय यंत्रणेतील डॉक्टर,परिचारिका यांचे मानधन देण्यात येणार आहे. अशी माहिती शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी दिली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्याच्या जय्यत तयारीसाठी आंबेगाव तालुक्यातील विविध संस्था भिमाशंकर सहकारी कारखाना ,शरद सहकारी बँक,पराग मिल्क फुड्स यांच्या सहकार्याने तसेच आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते गृहमंत्री ना दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विलगीकरण कक्षातील कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात येणार आहे. अवसरी येथील शिवनेरी जम्बों कोविड कक्ष व उपजिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्ण व कर्मचाऱ्यांना पौष्टिक नाश्ता व हळद व दूध देवेंद्र शहा फाउंडेशन च्या वतीने देण्यात येणार आहे. जम्बों हॉस्पिटलसाठी सर्व यंत्रणेची तयारी चालू आहे त्या कार्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा असे आव्हान शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी केले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *