नगरच्या कोतवाली पोलिसांची उत्तम कामगिरी : ए टी एम मशीन फोडणाऱ्यांना केले जेरबंद

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
१५ जानेवारी २०२२

अहमदनगर


नगर शहरातील माळीवाडा परिसरातील एसबीआय बॅंकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पकडण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. यात सनि सुरजसिंग भोंड, सोनू सुरजसिंग भोंड व रोहीत (चिक्या) निवृत्ती मेहेत्रे अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.

जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, कोतवाली पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार, सहाय्यक पोलीस निरक्षक विवेक पवार, पोलीस उप निरीक्षक मनोज महाजन, सहाय्यक फौजदार मुनफन, चालक पो हे काँ सतिष भांड, चालक स फौ अस्लम पठाण, पोना योगेश भिंगारदिवे, पोना गणेश धोत्रे, पोना योगेश कवाष्टे, पोना नितीन शिंदे, पोना सलिम शेख, पोना संतोष गोमसाळे, पोना मुकुंद दुधाळ, पोकाँ अभय कदम, पोकाँ दिपक रोहकले, पोकाँ अमोल गाढे, पोकाँ सोमनाथ राऊत, पोकाँ अतुल काजळे, पोकाँ याकुब सय्यद, पोकाँ संदीप थोरात, पोकाँ कवळे, पोकाँ केकान, पोकाॅ कैलास शिरसाठ, महिला पोकाॅ पुनम नरसाळे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

सविस्तर माहिती अशी की, दि १३ जानेवारी २०२२ रोजी रात्री ११.३० वा च्या सुमारास, पोलीस नियंत्रण कक्ष येथून वायरलेसव्दारे कॉल आला की, माळीवाडा वेस येथील एसबीआयचे एटीएम हे कोणी तरी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानुसार वायरलेस ड्युटी करीता असलेल्या मपोकाँ पुनम नरसाळे यांनी तात्काळ सदरचा संदेश पोलीस स्टेशनचे व्हाट्सअॅप ग्रुपवर प्रसारीत केला. संदेश मिळताच पोनि संपतराव शिंदे यांनी तात्काळ सदर ठिकाणी रवाना होणेबाबत आदेश दिले.

कोतवाली पथकाने तात्काळ त्या ठिकाणी जाऊन पाहणी करता, आरोपी सनि सुरजसिंग भोंड (वय २५ वर्ष, रा. संजयनगर, काटवन खंडोबा, अहमदनगर) हा SBI एटीएम मशीनचा खालील भाग हाताने ओढताना मिळून आला, त्यास जागीच ताब्यात घेतले. तसेच फरार आरोपी यांचा गुन्हे पथकातील कर्मचारी यांनी शोध घेतला असता, चिक्या उर्फ रोहीत निवृत्ती मेहेत्रे (वय २५ वर्ष, रा. माळीवाडा, हाजी सुलेमान गल्ली अहमदनगर) तसेच सोनु सुरजसिंग भोंड (वय २२ वर्ष, रा। संजयनगर, काटवन खंडोबा, अ. नगर) हे मिळून आले. या घटनेबाबत पोलीस नायक योगेश कवाष्टे यांनी दिलेल्या फियादीवरुन, गुन्हा रजि. क्र. ३७/२०२२ भादवि कलम ३७९, ५११, ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोना गणेश धोत्रे हे करीत आहेत.कोतवाली पोलिसांच्या या कामगिरीबद्दल, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *