दोघा भावंडांच्या अथक परिश्रमाने जंगलामध्ये वन्यप्राण्यांसाठी पाणी पिण्याचा झरा

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
७ जानेवारी २०२२

पिंगळवाडी(ता.आंबेगाव )


पिंगळवाडी(ता.आंबेगाव ) येथील कळमजाई मंदिरा मागील जंगलामध्ये वन्य प्राण्यांसाठी असणारा पाणी पिण्याचा झरा दरवर्षी गाडला जातो.पिंगळवाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते तसेच बिरसा ब्रिगेड आंबेगावचे उपाध्यक्ष दत्तात्रय वाघ व त्यांचे छोटे बंधू जनक वाघ हे दोन्ही भाऊ गेल्या तीन वर्षापासून जे वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी भटकंती करत असतात ते लक्षात घेवून पाण्याचा झरा खोदून तिथे साफसफाई करून व्यवस्थित केला जातो.साधारणतः सहा ते सात महिने हे पाणी पिण्यासाठी पशु-पक्षांना तसेच जगंलातील अन्य प्राण्यांना मिळते.

या वेळी अनेक वेळा जुन्नरचे फॉरेस्ट ऑफिसर श्री.रमेश खरमाळे सर यांचे या दोघा भावांना मार्गदर्शन लाभले तसेच युवा पिढीसाठी ते आदर्श प्रेरणादायी ठरतायत, सामाजिक सेवा निसर्ग सेवा हाच त्यांचा वसा आहे. खरमाळे सरांमुळे आम्हाला त्यांचे विचार ऐकून आमच्या कामाचा एक दिवस वन्य प्राण्यांसाठी म्हणून आम्ही दोघे भाऊ. दरवर्षी वेळ देत असतो जल जंगल जमीनच संवर्धन करा झाडे लावा झाडे जगवा हा संदेश या दोन्ही भावांनी येणाऱ्या पिढीसाठी दिला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *