डॉ. समीर पठाण यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
२८ डिसेंबर २०२१

पुणे


समर्थ भारत माध्यम समूहाचे मुख्य संपादक डॉ. समीर पठाण यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड झाली आहे. दि. २५ डिसेंबर रोजी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी डॉ. समीर पठाण यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या महाराष्ट्र राज्य पत्रकार प्रबोधिनीची जबाबदारी सांभाळली आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सदस्य असणाऱ्या रमाकांत गोऱ्हे यांनी डॉ. समीर पठाण यांची अध्यक्ष म्हणून निवडीसाठी सूचना केली तर जेष्ठ पत्रकार बी. जी. बोऱ्हाडे यांनी या सूचनेस अनुमोदन दिले. या बैठकीस उपस्थित असणाऱ्या सर्वांनी एकमताने या निवडीच्या ठरावास मान्यता देऊन डॉ. समीर पठाण यांची अध्यक्ष म्हणून निवड केली. राज्यभरातून आलेल्या पत्रकार बांधवांनी या निवडीने एक अभ्यासू, आक्रमक आणि आश्वस्त करणारा प्रतिनिधी भेटल्याचे समाधान व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ हा महाराष्ट्रातील संपादक, श्रमिक पत्रकार, मुक्त पत्रकार, इलेक्ट्रोनिक माध्यमांचे प्रतिनिधी, सोशल मिडियाचे प्रतिनिधी तसेच माध्यमांतील इतर प्रतिनिधी यांच्या साठी विविध पातळ्यांवर काम करणारा संघ आहे. कायदेमंडळ, प्रशासन, न्यायपालिका आणि माध्यमांमध्ये आदर्श समतोल ठेवून लोकशाही मुल्यांची जोपासना करणे आणि जनतेचे हित साधने हा या पत्रकार संघाचा मुख्य उद्देश असून पत्रकारांचे प्रशिक्षण, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी, पत्रकारांचे जीवनमान उंचावणे, प्रतिष्ठा राखणे या साठी आपण काम करणार असल्याचे डॉ. पठाण यांनी यावेळी सांगितले.या निवडीसाठीच्या बैठकीस जे पत्रकार बांधव उपस्थित राहू शकले नाही, त्यांना झूम मिटींग या ऑनलाईन लर्निग टूल च्या माध्यमातून सहभागी करून घेण्यात आले होते. ज्या पत्रकार बांधवांनी ऑनलाईन सहभाग घेतला त्यांनी देखील या बैठकीत आपली मते मांडली. या या बैठकीचे प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार रजनी साठे यांनी केले तर आनंद पुराणिक यांनी आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *