पुणे शहर कॉंग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग पुणेची जिल्हास्तरीय बैठक संपन्न

मंगेश शेळके
ओझर प्रतिनिधी
१६ डिसेंबर २०२१

ओझर


पुणे शहर कॉंग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग पुणे येथील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक,राज्य सरचिटणीस डॉ राणी दुष्यंत खेडीकर, यांच्या उपस्थितीत दुपारी 12 वा. स्थळ -महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक वाडिया कॉलेज समोर पुणे. येथे घेण्यात आली.अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून खालील कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात आला व कृती योजना आखण्यात आली. यामध्ये

सांस्कृतिक विभाग सबळीकरण करण्या बाबत चर्चा,दिनांक २८ डिसेंबरला वर्धापन दिनानिमित्त दीव्यांग व अनाथ मुलांना स्नेह भेट व खाऊ वाटप कार्यक्रम घेण्यात येईल,महिन्यातून एकदा कला सादरीकरण कट्टा सुरू करण्यात येईल. ‘कला जलसा’,राज्य पातळीवर कला सादरीकरण व काव्य संमेलन पुण्यात घेण्यात येईल,सदस्य व पदाधिाऱ्यांना संगठित करण्यात येईल. याप्रसंगी व्यासपीठावर विठ्ठल गायकवाड, अभिजीत जाधव,श्री राजेंद्र शेळके, मसापचे कार्यवाहक अँड. प्रमोद जी आडकर, बाळासाहेब ननावरे,नकुसा ताई लोखंडे, कवि बाळासाहेब बनसोडे शाहीर, बाळासाहेब ननावरे कला संघटक, एनएसयूआयचे जनरल सेक्रेटरी प्रेरणाताई गायकवाड, स्वागत अध्यक्ष आणि नगरसेविका लताताई राजगुरू, अलकाताई कांबळे कला संघटिका, युवा नेते कुणाल राजगुरू उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *