पेठ येथील तलाठी हेमंत भागवत यांच्यावर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल :लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांची धडक कारवाई

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१६ डिसेंबर २०२१

आंबेगाव


आंबेगाव तालुक्यातील पेठ येथील तलाठी हेमंत भागवत यांना शेतकऱ्याकडून जमिनीचा फेरफार करून सातबारा नोंद करण्यासाठी ६ हजारांची लाच मागितली होती. त्यातील ४ हजाराची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबतची फिर्याद ३२ वर्षीय शेतकरी रा.पारगाव पेठ ता.आंबेगाव पुणे यांनी दाखल केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पेठे येथील शेतकरी यांनी त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीची खरेदी केली असून या जमिनीचे फेरफार करून सातबारा सदरी नोंद घेण्यासाठी तलाठी हेमंत भागवत यांनी शेतकरी यांच्याकडे ६ हजार रुपयाची मागणी केली होती. यात तडजोड होऊन ४ हजार रुपये घेण्याचे ठरले होते. ही पैशाची मागणी दि.२/११/२०२१ ते ९/११/२०२१ च्या दरम्यान घडली आहे. तलाठी यांच्याकडून पैशाची मागणी होत असल्याने फिर्यादी शेतकरी यांनी या बाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी दि.१५/११/२१ रोजी सापळा रचून तलाठी भागवत याला लाच घेताना पकडनार होते. मात्र पोलीस त्याला पकडण्यासाठी आले असतात तो गाडीवर पळून गेला आहे. दि. १५ रोजी तलाठी हेमंत भागवत हे आंबेगाव तहसील कार्यालयात काम करत होते घटनेची माहीती समजताच ते तेथुन पळुन गेले

पोलीस त्याचा शोध घेत आहे. या घटनेचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस निरीक्षक अलका सरग करत आहेत. अशाप्रकारे शेतकऱ्यांकडे कोणी लाच ( पैशाची मागणी ) करत असेल तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून आंबेगाव तालुक्यात अनेक तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याची बोलले जात आहे. पेठ येथील तलाठी भागवत यांनी या अगोदरही अनेक शेतकऱ्यांना त्रास दिले असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे तसेच आंबेगाव तहसिल पुरवठा शाखा या ठिकाणीही असाच काही प्रकार घडत असल्याची चर्चा होत आहे.

 

 

 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *