पुण्याच्या रणरागिणी रुपाली पाटील ठोंबरे यांचा मनसेला जय महाराष्ट्र

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१५ डिसेंबर २०२१

पुणे


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उपाध्यक्षा पुण्याच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पत्र लिहून मनसेला जय महाराष्ट्र करत लवकरच राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे सुत्रांकडून समजले.. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुण्याचा दौरा अवघ्या दोन दिवसांवर असताना हा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे..

पक्षांतर्गत कलहामुळे मागील काही दिवसांपासून रुपाली पाटील या राजीनामा देणार असल्याचे बोलले जात होते त्याला आता शिक्कामोर्तब झाले. अखेर मंगळवारी त्यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून आपल्या सर्व पदांचा राजीनामा मनसेचे नेते अनिल शोदोरे राजीनामा सुपूर्द केला.

पुण्यातील रणरागिणीने राजीनामा दिल्याने मनसेला मोठे खिंडार पडल्याचे बोलले जाते. त्यांनी पुण्याच्या राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्या शूटिंग बॉल च्या नावाजलेल्या खेळाडू होत्या. तेव्हाही त्या मोठ्या आक्रमकतेने हा खेळ खेळत असे. त्यातूनच त्यांना बेधडक आणि आक्रमकतेचे धडे मिळाले ते राजकीय जीवनातही महत्वाचे ठरले. बेधडक स्वभावामुळेच प्रकाशझोतात आल्या..मनसेच्या कित्येक आंदोलनात त्या स्वतः रस्त्यावर उतरून आक्रमकतेने आंदोलने यशस्वी पार पाडली. इकडे राज ठाकरे पक्ष बांधणी करत असतानाच ठोंबरे यांचा राजीनामा म्हणजे पक्षाला मोठा धक्का मानला जातो. त्या लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील असे सूत्रांकडून समजते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *