व्यावसायिकाला लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या अवघ्या दोन दिवसात पोलीसांनी आवळल्या मुसक्या

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
१० डिसेंबर २०२१

जुन्नर/आळेफाटा


जुन्नर तालुक्यातील वाढत्या दरोड्यांना आळा घालण्यात स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व आळेफाटा पोलिसांना यश आले आहे. नुकत्याच आळेफाटा येथे सहा डिसेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अविनाश जालिंदर पठाडे यांच्या मालकीच्या साई इलेक्ट्रॉनिक या दुकानात सहा जणांनी एंप्लीफायर रिपेअर करायचा आहे असा खोटा बनव करून पिस्तुलाचा धाक दाखवून जबरदस्तीने दरोडा टाकून 21 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल व रोख रक्कम लुटून नेली होती.

स्थानिक गुन्हे शाखा व आळेफाटा पोलिसांची दमदार कामगिरी

या गुन्ह्यातील आरोपी ऋषिकेश बळवंत पंडित (वय २२ राहणार खरवंडी, ता. नेवासा जिल्हा नगर) अरबाज नवाब शेख (वय २० रा. वडाळा व्हरोंबा तालुका नेवासा ) वैभव रवींद्र गोरे वय २२ रा. खरवंडी,तालुका नेवासा) राहुल राम चव्हाण वय २० रा.खरवंडी तालुका नेवासा) प्रकाश विजय वाघमारे (वय २० रा. माळीचिंचोरा ता नेवासा) शुभम बाळासाहेब शिंदे (वय २१ रा खरवंडी ता नेवासा) या आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी आळेफाटा येथे भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला

ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी चे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, आळेफाटा चे नवनियुक्त पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, सुनील बडगुजर, पोलीस हवालदार दिपक साबळे, राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, दगडू विरकर, प्रसन्ना घाडगे, प्रमोद नवले, पोलीस मित्र प्रसाद पिंगळे तसेच आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे, रागिनी कराळे, राजेंद्र पवार, हवालदार विनोद गायकवाड, लहानु बांगर, अमित माळुंजे, निखिल मुरूमकर, मोहन आनंदगावकर, हनुमंत ढोबळे, महेश कोठमोरे, अरविंद वैद्य, प्रशांत तांगडकर, गोरक्ष हासे, ओतुर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल केरूरकर, हलालदार महेश पठारे, युवराज पाटील, किशोर जोशी यांनी या गंभीर स्वरूपाचा दरोड्याचा गुन्हा अवघ्या दोन दिवसात उघडकीस आणला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर हे करीत आहेत.

दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी आळेफाटा येथे भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे युवा नेते अमित बेनके जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, विजय कु-हाडे, सामाजिक कार्यकर्त्या सुंदरताई कु-हाडे, डॉ. वैशाली देवकर यांनी आळेफाटा येथे भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला व पोलिसांच्या कामगिरीचे अभिनंदन केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *