मंगरूळमध्ये उसाच्या फडात आढळले बिबट्याची पिल्ले

रामदास सांगळे
बातमी प्रतिनिधी,जुन्नर
२७ नोव्हेंबर २०२१

बेल्हे


मंगरुळ येथील गणेशनगर भागात ऊस तोडणी चालू असताना शुक्रवार (दि.२६) रोजी एका शेतात बिबट्याची दोन पिल्ले आढळून आली. त्या बिबट्याच्या पिल्लांना आई पर्यंत पोचवण्याची कार्यवाही वनविभागाने केली आहे. याबाबत वनविभागाने दिलेली माहिती अशी की मंगरुळ (ता. जुन्नर) येथील गणेशनगर भागात चिमाजी बाबुराव येवले यांच्या उसाच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना दुपारी चार वाजता दोन बिबट्याची पिल्ले आढळून आली.

पिल्लांना आईपर्यंत पोहचवण्यासाठी वनविभागाची कार्यवाही

ग्रामस्थांनी सदर घटना तात्काळ वनविभागाला कळवली. या पिल्लांची माहिती मिळताच ओतूरचे वन परिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनानुसार बेल्हे वनपाल आर.यू .वीर व पारगाव तर्फे आळे वनरक्षक राजू गाढवे व त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्या पिल्लांची डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली. अडीच महिने व दुसरं नऊ महिन्याचे नर व मादी अशी दोन पिल्ले होती. तसेच या पिलांना त्यांच्या आईपर्यंत पोहोचण्याची कारवाई केली.

 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *