मंचर ग्रामपंचायत चे अखेर नगरपंचायत मध्ये रूपांतर

सदानंद शेवाळे
ब्यूरो चीफ,आंबेगाव
२६ नोव्हेंबर २०२१

मंचर


मंचर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यासाठी राज्याच्या नगरविकास खात्याने पाठवलेल्या प्रस्तावाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून त्याबाबतची अधिकृत घोषणा आज नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथजी शिंदे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे-पाटील व शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत आज केली. मंचर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर व्हावे म्हणून गेल्या अनेक महिन्यापासून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये श्रेयवादाची लढाई चालू होती. मागील वर्षी च्या डिसेंबर महिन्यापासून ” होणार होणार ” म्हणून नगरपंचायत चे भिजत ठेवलेले घोंगडे त्यात ग्रामपंचायत की नगरपंचायत या संभ्रमात पार पडलेली ग्रामपंचायत ची निवडणूक तसेच मंचर शहर भाजपा ने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करून घेतलेल्या आक्रमक भूमिकेमूळे मंचर शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते त्याला आज २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी झालेल्या नगरपंचायत च्या घोषणेने पूर्णविराम लागला. दरम्यान नगरपंचायत ची घोषणा झाल्यावर मंचर ग्रामपंचायत समोरील पटांगणात शिवसेनेचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसोबत पेढे वाटून व एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला तसेच भाजपा नेते व कार्यकर्त्यांनी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *