बेल्हे ते पुणे पीएमटी बस सेवा सुरू करा – पांडुरंग पवार

रामदास सांगळे
विभागीय संपादक
२३ नोव्हेंबर २०२१

बेल्हे


जुन्नर,आंबेगाव, शिरूर च्या नागरिकांच्या वेळेची व पैशाची होईल बचत

बेल्हे ते पुणे पीएमटी सेवा सुरू करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे व जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून बेल्हे ते जेजुरी या रस्त्याचे काम अतिशय दर्जेदार होणे पूर्ण झाले आहे. बेल्हे- पारगाव- पाबळ- शिक्रापूर- पुणे अशी सेवा असावी. जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील प्रवाशांची सोय होऊन यामुळे वेळ व पैशाची बचत होणार आहे.यामुळे उच्च शिक्षणासाठी पुणे येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील चांगली सोय होणार आहे. सध्या या मार्गावर थेट पुणे येथे जाणारी कोणतीही बस सेवा उपलब्ध नाही. तरी या मार्गावरती पीएमटी सेवा सुरू करावी.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *