त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भोसरी-मोशी प्रधिकरण येथे दीपोत्सव साजरा

रोहित खर्गे
विभागीय संपादक
 २० नोव्हेंबर २०२१

भोसरी


त्रिपुरारी पौर्णिमेनिमित दरवर्षाप्रमाणे याहीवर्षी दिनांक १८ नोव्हेंबर रोजी पर्यावरणपूरक दीपोत्सव संतनगर मित्र मंडळ, भूगोल फाउंडेशन आणि इंद्रायणी सेवा संघ, व इतर संस्थांच्या सहभागातून सेक्टर नं. ७, डिस्ट्रिक्ट सेंटर- सर्कल. MIDC पोलीस स्टेशन जवळ स्पाईन रोड, प्राधिकरण मोशी, पुणे येथे पार पडला. सध्या वाढत चाललेल्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची, आपल्या वसुंधरेची हानी होत आहे आणि त्यामुळे आपले आरोग्यही धोक्यात आले आहे. आपली वसुंधरा यापासून वाचविण्यासाठी या भागायील पर्यावरण प्रेमी कार्य करत आहेत. याचाच एक भाग म्हणून एक दीप पर्यावरणासाठी* या संकल्पनेतून हा पर्यावरणपूरक दीपोत्सव गेले पाच वर्षे साजरा केला जातो.

एकच विचार प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणयुक्त असा आपला परिसर ठेऊन इतरांचेही जनजागरण, जनप्रबोधन करण्यासाठी हा उपक्रम श्री. विठ्ठल नाना वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येतो जेणेकरून आपला भाग / गाव, आपले शहर, आपला जिल्हा ,आपले राज्य, आपला देश, आपली भुमाता, वसुंधरा* सुजलम, सुफलाम आणि प्रदूषणमुक्त होण्यास मदत होईल. यावेळी आपल्या परिसरातील महिलांनी उत्कृष्ट अशा पर्यावरण पूरक रांगोळया काढल्या होत्या. यावेळी MIDC पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शिवाजीराव गवारे साहेब यांच्या व प्रभागातील नगरसेवक व कार्यकर्ते यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी नगरसेवक श्री संजयशेठ वाबळे, विलासभाऊ मडेगिरी, विक्रांत लांडे पा. नागरसेविका सौ नम्रता ताई लोंढे, सामाजिक कार्यकर्ते योगेशभाऊ लोंढे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख निलेशशेठ मुटके,कामगार नेते हनुमंत लांडगे, सचिनभैय्या लांडगे, पोलीस निरीक्षक पाटील साहेब,विद्यापीठ सिनेट सदस्य पांडुरंग वाळुंज, श्री शिवलिंग ढवळेश्वर सर, व असंख्य पर्यावरण प्रेमी सहकारी पुरुष, महिला व मुले सहभागीं झाले होते, सर्वांच्या हस्ते हजारो दिवे लावून भगवान महादेवांच्या पिंडीच्या आकाराचा सर्कल परिसर तेजोमय करण्यात आला.यावेळी विठ्ठल नाना वाळुंज यांनी पर्यावरणाचे महत्व पटवून दिले आणि आपला परिसर स्वच्छ, सुंदर, हिरवागार राहण्यासाठी झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचे आव्हान केले.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भोसरी-मोशी प्रधिकरण येथे दीपोत्सव साजरा

तसेच उपस्थित अनेक मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केले.आपली वसुंधरा हिरवीगार, सुशोभित करण्यास मदत करण्यासाठी झाडांचे योगदान आहे म्हणून मान्यवरांचा व ह्या कार्यक्रमत विशेष सहकार्य केलेल्या सहकाऱ्यांचा वृक्षांची रोपे देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम उत्तम असा पार पाडण्यासाठी सर्वच संस्थाचे सहकारी आणि महिला , मुली यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अनिल जगताप, साहेबराव गावडे, अजिंक्य पोटे,गणेश सैंदाणे,राजेंद्र ठाकूर, शशिकांत वाडते,भास्कर दातीर, राजेश किबिले, केदार काका तसेच महिला शोभा फटांगडे, मिना आखाडे,शिला इचके, ज्योती दरंदळे,प्रणिता मोरे व इतर अनेक सर्वच कार्यकर्ते पुढाकार घेऊन संयोजन करण्यात मोलाची भूमिका बजावली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *