खासदार डॉ.अमोल कोल्हे चिंतनासाठी गेले एकांतवासात

रोहित खर्गे
विभागीय संपादक
८ नोव्हेंबर २०२१

पुणे


राजकारण म्हटले की ताण, तणाव आलाच मग तो घालवण्यासाठी कोण्ही पुस्तक वाचन करतात तर कोण निसर्गाच्या सानिध्यात मित्रांसमवेत फिरण्यासाठी जाऊन वेळ घालवतात व ताण कमी करतात. तर कोण्ही कुटुंबियांना वेळ देतात. असेच शिरूर लोकसभा राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी शनिवारी त्यांच्या नारायणगाव येथील कार्यालयात मतदार संघातील कार्यकर्ते, नागरिक , नेते मंडळी व जनतेची दिवाळी सदिच्छा भेट व शुभेच्छा देण्यासाठी सकाळी ८ ते रात्री ११ पर्यंत नागिरीकांमध्येच रममाण झाले. व रात्रीचे जेवन कुटुंबियांसमवेत घेतले.

आणि रविवारच्या भल्या पहाटे एकांतवासात निघून गेले. व उशिरा सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. त्यात गेल्या काही दिवसात , महिन्यात, वर्षात बेभाम होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलं उचलली. पण हे सगळे जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय…थोडा शारिरीक, बराचसा मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन !

घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फरविचार सुद्धा !

त्यासाठीच एकांतवासात जातोय…अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकत रविवारच्या पहाटे खासदार डॉ अमोल कोल्हे यांना त्यांचा चालक चांद एकांतवासात सोडून आता खासदार कोल्हे परत एकांतवासातून येईपर्यंत सुट्टीवर असणार असल्याने चांद लाही खूप महिन्यानंतर सुट्टी मिळाली आहे.

खासदार डॉ.अमोल कोल्हे चिंतनासाठी गेले एकांतवासात

त्यामुळे आता काही काळ संपर्क होणार नाही ! व आलेवर आपण पुन्हा नव्या जोमाने , नव्या जोशाने भेटू फक्त चिंतानासाठी जातोय चिंतनशिबिरासाठी नाही असेही त्यांनी सोशल मीडियावर सांगितले.

ते केव्हा येणार हे कोणालाही माहीत नसले तरी नारायणगाव येथील एका घरगुती कार्यक्रमात ८ दिवसानंतर दिसण्याची शक्यता आहे असे सूत्रांकडून समजले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *