केशव घोळवे यांच्या प्रयत्नाने वैद्यकीय कर्मचाऱ्यांची दिवाळी सुवर्णमय

रोहित खर्गे
विभागीय संपादक
४ नोव्हेंम्बर २०२१

पिंपरी


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रजनन व बाल आरोग्य विभागातील २२ कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत दाखल करून घेण्यासंदर्भात शासन आदेश निघाला असून या आदेशामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी सुवर्णमय झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर व राज्याचे कामगार नेते केशव घोळवे यांनी या संदर्भात सातत्याने प्रयत्न केले असून त्यांच्या या प्रयत्नाने या कर्मचाऱ्यांना ही दिवाळी भेट प्राप्त झाली आहे.

22 कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचे राज्य शासनाचे आदेश.

गेली सोळा वर्षे हे २२ कर्मचारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रजनन व बाल आरोग्य विभागात मानधनावर काम करत होते. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्णयानुसार 2006- 2007 पासून हे कर्मचारी माता व बालमृत्यू दर व एकूण प्रजनन दर कमी करण्याच्या हेतूने काम करत होते. याच बरोबर शहरातील सर्व आरोग्यविषयक कार्यक्रम व समाज सक्षमीकरण कार्यक्रमाची प्रसिद्धी, जनजागृती व अंमलबजावणी तसेच झोपडपट्टी, झोपडपट्टी सदृश्य भागातील नागरिकांचे आरोग्यमान उंचविण्यासाठी म्हणून या कर्मचाऱ्यांचे खूप मोठे योगदान प्राप्त झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध वैद्यकीय प्रकल्पांवर काम करत असतानाच कोरोना च्या काळात कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरुना रुग्णांना वेळेत उपचार होण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे.

या सर्व कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत दाखल करून घ्यावे यासाठी राज्यातील कामगार नेते व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी उपमहापौर केशव घोळवे यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सभेत ठराव क्रमांक 556 दिनांक 26 8 2020 अन्वये यासंदर्भातील ठरावही मंजूर करण्यात आला आहे.

केशव घोळवे यांनी या सर्व गोष्टींचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे दिनांक 2 नोव्हेंबर रोजी शासन निर्णय क्रमांक पीसीसी २०२०/प्र.क्र.३७९/नवि-२२ अन्वये महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी – छापवाले यांनी आदेश पारित करून 22 कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत दाखल करून घेण्याबाबत आदेश दिले आहेत.

यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांची कामगार नेते केशव घोळवे व या कर्मचाऱ्यांनी भेट घेतली असून यासंदर्भातील योग्य ती कार्यवाही करण्याबाबतची विनंती करण्यात आली आहे.

केशव घोळवे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून सतत प्रयत्न केले आहेत. यासंदर्भात मंत्रालयात नगर विकास विभागात तब्बल 41 बैठका घेण्यात आल्या.

केशव घोळवे यांच्या प्रयत्नांमुळे नुकतेच अंगणवाडी बालवाडी शिक्षिकांना देखील न्याय मिळाला आहे त्याचबरोबर कोविड योद्धा कर्मचाऱ्यांना देखील न्याय मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. महानगरपालिकेच्या स्मशान भूमी कर्मचाऱ्यांना देखील कायम सेवेत दाखल करून घेण्याबाबत ते प्रयत्न करीत आहेत याच बरोबर शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाला तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शहर शाखेला स्वतःच्या हक्काचे कार्यालय मिळावे यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले असून त्यांच्या या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे.

वैद्यकीय विभागातील हे बावीस कर्मचारी नियमित सेवेत दाखल करून घेण्याच्या शासन आदेश प्राप्त झाल्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांनी केशव घोळवे यांचे धन्यवाद व्यक्त केले तसेच पेढे वाटून व फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *