मनसेकडून यामुनानगरमधील आरोग्य कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; दिवाळीनिमित्त कामगारांना मिठाई आणि पणत्यांचे वाटप

रोहित खर्गे
विभागीय संपादक
५ नोव्हेंबर २०२१

पिंपरी


पिंपरी-चिंचवड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक 13 मधील सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त मिठाई व पणत्या वाटप करण्यात आल्या. आपल्याबरोबर शहराची स्वछता ठेवणाऱ्या कामगारांची देखील दिवाळी आनंदात साजरी व्हावी. हा उद्देश समोर ठेऊन शहाराध्यक्ष सचिन चिखले यांनी कामगारांची दिवाळी गोड केली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील आरोग्य विभागाच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून शहराची स्वच्छता केली जाते. शहराच्या स्वच्छतेमध्ये सफाई कामगार मोलाचा घटक मानला जातो. दिवाळी साजरी करत असताना या घटकाला विसरून चालणार नाही, या भावनेपोटी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी प्रभाग क्रमांक 13 यमुनानगरमधील सफाई कामगारांना दिवाळीनिमित्त भेट वस्तू दिल्या. आज लक्ष्मीपूजन असल्याने याचा मुहूर्त साधून चिखले यानी मनसेतर्फे सफाई कामगारांना मिठाई आणि पणत्या भेट दिल्या आहेत. सफाई कामगारांच्या आनंदात सहभागी होण्याचा छोटासा क्षण मला लाभला. त्यामुळे माझी सुद्धा दिवाळी आरोग्य कामगारांच्या आशीर्वादाने द्विगुणित झाली आहे, अशी भावना चिखले यांनी व्यक्त केली.

यावेळी मनसे शहर उपाध्यक्ष विशाल मानकरी, जामदार काका, प्रकाश काळे, गोवर्धन काळे, निगडी व्यापारी संघटनेचे रोहीदास शिवणेकर, तुकाराम काळभोर, रोहीत काळभोर , गणेशभाऊ आवघडे , नियाजभाई शेख आदी उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *