पिंपरी चिंचवड वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयुक्तांच्या निवासस्थानी दिवाळी पहाट आत्मक्लेश आंदोलन

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०२ नोव्हेंबर २०२१

पिंपरी


जाहीर एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन

पिंपरी चिंचवड शहर वंचित आघाडीच्या वतीने गुरुवार दिनांक ४ नोव्हेंम्बर २०२१ रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेत पिंपरी चिंचवड चे आयुक्त राजेश पाटील यांच्या निवासस्थानी आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित आघाडीचे शहराध्यक्ष देवेन्द्र तायडे यांनी सांगितले.

खालील मुद्द्यांवर हे अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे.

1) ठेकेदार,नगरसेवक व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातुन व संगनमताने होत असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आर्थिक लुट व दिवाळखोरी विरोधात.

2) आरोग्य वैद्यकीय विभागातील ठेकेदारी व त्या माध्यमातुन डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना वेठबिगार करण्याच्या धोरणा विरोधात.

3) महापालिकेच्या स्थायी समितीत उघड उघड झालेला भ्रष्टाचार व तदनंतर देखील पदावर कार्यरत असणारे स्थायी समिती अध्यक्ष व त्यांचे सहकारी यांची त्यांच्या पदावरून हकालपट्टी करून त्यांचे नगरसेवक पद रद्द करून भ्रष्टाचारानंतर त्यांनी घेतलेले सर्व निर्णय व मंजुर केलेला निधी तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी.

4) कोरोना महामारीच्या काळात शिक्षण विभागतील हलगर्जी व बेजबाबदार पणामुळे तसेच नियोजन शुन्य कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या नुकसानी विरोधात व ऑनलाइन शिक्षणाची वल्गना करून या साठी आवश्यक असणारी साधने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यास असमर्थ ठरलेल्या महापालिका प्रशासनाच्या विरोधात.

5) स्मार्ट सिटीच्या माध्यमातुन सर्वसामान्य जनतेच्या पैशांची ठेकेदारामार्फत होत असलेल्या लुटीच्या विरोधात.

6) महापालिकेच्या विविध विभागात आलेली ठेकेदारी व त्या माध्यमातुन ठेकेदारामार्फत कामावर असलेल्या कामगारांच्या आर्थिक शोषणा विरोधात.

7) महिला व बाल कल्याण विभागाच्या योजना गरजु व जास्तीत जास्त महिला व बालकांपर्यंत पोहचवण्यास असमर्थ ठरत असलेल्या महापालिका प्रशासनाच्या विरोधात.

तरी सदर आंदोलनात वंचित बहुजन आघाडी व महिला आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहाणे अनिवार्य असुन आपल्यासह आपल्या भागातील नागरिकांपर्यंत हा विषय पोहचवून त्यांना देखील या आंदोलनात सहभागी करून घ्यावे असे आवाहन निवेदनाद्वारे करण्यात आले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *