प्रा.रामकृष्ण मोरे पुण्यतिथीनिमित्त छायाचित्र प्रदर्शनाद्वारे त्यांच्या आठवणींना उजाळा

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०२ नोव्हेंबर २०२१

पिंपरी


 

महाराष्ट्राचे माजी शालेय शिक्षणमंत्री स्व.प्रा.रामकृष्ण मोरे सरांच्या १८ व्या पुण्यतिथी निमित्त प्रा.रामकृष्ण मोरे प्रेमी मित्र परिवार व काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या वतीने आज पिपंरी येथे सरांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी छायाचित्र प्रदर्शन व स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

पिंपरी तील सावित्रीमाई फुले स्मृती स्मारक येथे सकाळी ११ वा. या कार्यक्रमाची सुरूवात रामकृष्ण मोरे सरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली.

या वेळी सरांच्या जीवनाकार्यावर आधारित पोवाडा शाहीर सुरेश राव सुर्यवंशी सांगलीकर यांनी सादर केला.

या प्रसंगी सर्वपक्षीय उपस्थित मान्यांवरांनी आपल्या जुन्या आठवणी व प्रसंगाना उजाळा देत सरांच्या कार्यांचे व गुणवैशिष्टांचे स्मरण केले.

Prof. Ramakrishna More recalls him through a photo exhibition on punya tithi
उपस्थित मान्यांवरांनी आपल्या जुन्या आठवणी व प्रसंगाना उजाळा देत सरांच्या कार्यांचे व गुणवैशिष्टांचे स्मरण केले

“…महाराष्ट्रीतील भीषण दुष्काळ काळात विद्यार्थीच्यां फी माफी, नोकरी बाबत मागण्या मान्य करवून घेण्यासाठी सरांनी लढा उभा केला व यश मिळवले.”

या प्रसंगी बोलताना उल्हासदादा पवार म्हणाले, “महाराष्ट्रीतील भीषण दुष्काळ काळात विद्यार्थीच्यां फी माफी, नोकरी बाबत मागण्या मान्य करवून घेण्यासाठी सरांनी लढा उभा केला व यश मिळवले, त्यांनी कार्यकर्त्यांना मोठे करण्यात भरीव त्योगदान दिले ते वाचन प्रिय व अभ्यासू व्यक्तीमत्व होते. जाती धर्मापलिकडे जाऊन व्यापक राजकारणात करत कार्यकर्ते मोठे करण्याचे काम त्यांनी जीवनात केले, त्यांचा विधीमंडळातील भाषणे शब्दफेक अतिशय उत्तम असे, त्यांची पोकळी आज भरून येऊ शकत नाही, पिपंरी चिचंवड चा विकास त्यांच्या दूरदृष्टीने घडला, पत्रकारिता, नाट्य क्षेत्र, कला क्षेत्र, शिक्षण क्षेत्र यात नाविन्य आणण्याचे काम त्यांनी केले”

प्रदेश प्रवक्ते रत्नाकर महाजन म्हणाले, “१९७३ साली पुणे येथील तारचंद वैद्यकीय महाविद्यालयातील संपा दरम्यान त्यांनी युवक काँग्रेस कडून संपास पाठिंबा दिला तेव्हा पासून मी त्यांना ओळखत होतो, ते राजकारणी नव्हते तर ते कायम सिक्रीय कार्यकर्ते होते, पक्ष कोणताही असो विचार महत्वाचा व काँग्रेस विचार कधीही संपू शकत नाहीत असे ते मानत होते, ते कायम आर एस एस व बीजेपी विरोधी होते”.

Prof. Ramakrishna More recalls him through a photo exhibition on punya tithi
प्रा.रामकृष्ण मोरे पुण्यतिथीनिमित्त छायाचित्र प्रदर्शनाद्वारे त्यांच्या आठवणींना उजाळा

“…ते मदत करत, ते हजरजबाबी व अभ्यासू व्यक्तीमत्व होते, त्यांनी शहराचा चेहरा मोहरा बदलविला ते एक व्यासंग असणारे व्यक्तीमत्व होते.”

माजी आमदार विलास लांडे म्हणाले, “काँग्रेस मधील त्यांचे योगदान उल्लेखनीय होते, सरांसमोर जाताना नेहमी आदरयुक्त भिती चे वातावरण असे कारण ते शिस्तीस कडक होते, कार्यकर्त्यांना केवळ राजकारणात नाही तर व्यावसायात देखील ते मदत करत, ते हजरजबाबी व अभ्यासू व्यक्तीमत्व होते, त्यांनी शहराचा चेहरा मोहरा बदलविला ते एक व्यासंग असणारे व्यक्तीमत्व होते त्याांच्या अनेक कार्यांचे आम्ही साक्षादार होतो ते मनाने खुप मोठे व विचारांनी प्रगल्ब्भ होते”.

नगरसेवक भाऊसाहेब भोईर म्हणाले, “परखड व्यक्तीमत्वाचे धनी असेलेल्या सरांनी कायम राजकारणात पद नाही तर पत महत्वाची असते असे सांगितले व ती पत सरांनी राजकारणात निर्माण करून दिली, मला आज स्पष्ट सांगावे लागेल की मी काँग्रेस सोडली नाही तर मला काँग्रेस सोडयला भाग पाडले गेले आजही मनांत काँग्रेस चे स्थान आहे ते सरांमुळेच मला सर कायम स्मृतीत आहेत व राहतील.”

या प्रसंगी माजी आमदार उल्हासदादा पवार, माजी आमदार मोहन दादा जोशी, माजी आमदार विलास लांडे, प्रदेश काँग्रेस प्रवक्ते रत्नाकर महाजन, अखिल भारतीय काँग्रेस चे सचिव पृथ्वीराज साठे, देहू येथील सरांच्या भगिणी सौ.शामाताई परदेशी, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, विलास कामठे, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक तात्या कदम, आप्पा बागल, विनायक रणसुंभे, सतिश दरेकर, नारायण बहिरवाडे, सदगुरू कदम, प्रसाद शेट्टी, प्रकाश मलशेट्टी, विश्वास गजरमल, युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंग वालिया, एन एस यु आय चे प्रदेश उपाध्यक्ष ॲड उमेश खंदारे, छायाताई देसले, पुजा बिबवे, के.एम.रॅाय, माऊली मलशेट्टी, के. हरीनारायणन, ईस्माईल संगम, विजय ओव्हाळ, बाबा बनसोडे, आबा खराडे, सौरभ शिंदे, श्याम भोसले, सतिश भोसले, कबीर मोहम्मद आदि पदाधिकारी व सरांचे बहूसंख्य चाहते उपस्थित होते.

या प्रसंगी सरांनी घडविलेले अनेक विद्यार्थी, चाहते, नेते व कार्यकर्ते यांनी सरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत सरांना आदराजंली वाहिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *