आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या नूतन कार्यालयाचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते उदघाटन

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१० ऑक्टोबर २०२१

पिंपरी

आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या नवीन भव्य नूतन कार्यालयाचे उदघाटन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते (शनिवार दि ९ ऑक्टोबर) फीत कापून पार पडले. यावेळी व्यासपीठावर पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश,आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुल परदेशी राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे उपस्थित होते. उपस्थितांचा सत्कार मुख्य संपादक अतुलसिह परदेशी, आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे ,आपला आवाज न्यूज नेटवर्क चे विभागीय संपादक रोहित खर्गे यांच्या हस्ते करण्यात आला.

गृहमंत्री वळसे पाटील आपल्या भाषणात बोलताना अतुल परदेशी यांनी १५ वर्ष प्रिंट मीडियामध्ये काम केले. ७ वर्षांपूर्वी जुन्नरच्या परिसरातून आपला आवाज न्यूज चॅनल ची सुरवात केली. ग्रामीण भागात यश मिळवल्यानंतर त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात येण्याचा निर्णय घेतला, आणि कमी कालावधीतच या शहरातही लोकप्रिय झालेले आहेत. दोन लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर मिळवले आहेत. भारतातच नव्हे तर भारताबाहेरही अस्तित्व निर्माण केले . एक काळ होता तेव्हा फक्त वृत्तपत्र च होती तेव्हा सकाळीच जगभरातील घडामोडी कळायच्या. पूर्वी वृत्तपत्रातील अग्रलेख वाचून लोक विचारांची दिशा ठरवायचे. हल्ली इलेकट्रोनिक मीडिया आल्यापासून त्यात बदल झालेला आहे. कारण इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कोण अगोदर बातमी देतो याची स्पर्धा असते. एक बाजूला इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया यामधून पोहचत असते. पण सकारात्मक विचार पुढे यायला पाहिजे व हीच जबाबदारी आपला आवाजने स्वीकारली आहे. निगेटिव्ह पेक्षा पोजिटिव्ह विचार पोहचवण्याचे काम आपला आवाज करत आहे. व माझी खात्री आहे त्यांना यात यश येईल.हे सर्व करत असताना संगीता तरडे यांच्या माध्यमातून आपला आवाज आपली सखी नावाचे महिलांसाठी एक व्यासपीठ तयार करून आज ५० हजार महिला आपला आवाज बरोबर जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्या या कार्याला माझ्या शुभेच्छा देतो.

आज आपण समाज्यातील विविध क्षेत्रातील तळागाळातील वेक्तींचा सत्कार घेतला त्यामुळे इतरांनाही चांगले काम करण्याची स्फूर्ती मिळेल. पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनीही आपल्या शैलीदार भाषणात आपला आवाज विषयी बोलताना हे चॅनल कसे सकारात्मक बातमीदारी करत आहे यावर प्रकाश टाकला. व उपस्थितांचे मन जिंकले.
यावेळी राज्येचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या
हस्ते समाजात विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या वेक्तींचा विविध पुरस्कार देऊन सन्मान करण्यात.
युवारत्न पुरस्कार- पांडाभाऊ साने,
समाजरत्न पुरस्कार- ज्योतिषाचार्य किरण नावणीतलाला गांधी,
आरोग्यदूत पुरस्कार- डॉ प्रणाली स्वरूपचंद शेलोत, बी.ए. एम.एस
उद्योजिका पुरस्कार- सौ. शितल विजय नवले.
उद्योगरत्न पुरस्कार- अनिता घारमाळकर
संघर्ष योद्धा पुरस्कार- दिनेशसिंग भगवनसिंग परदेशी
ग्रेटर इंटेरेपरेनेअर अवॉर्ड – संगीता तरडे यांना प्रदान करण्यात आला.

मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी आपल्या भाषणात बोलताना आपला आवाज न्यूज चॅनल पिंपरी चिंचवड शहरात अगदी कमी वेळेत लोकप्रिय झाले असून घराघरात पोहचले असल्याचे सांगितले. संगीता तरडे यांच्या माध्यमातून शहरातील ५० हजार महिलांचे संघटन ही विशेष बाब असल्याचे सांगितले. व नूतन कार्यालयास व कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.

खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी मनोगत वेक्त करताना मला येण्यास उशीर झाला त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी वेक्त करतो. शेतकऱ्यांविषयी जे घडले ते अतिशय खेदजनक असून जी अराजकता माजली आहे त्याचे वास्तव मीडियाने समोर आणायला पाहिजे. जे घडले ते सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले अशा भावना व्यक्त केली. पेट्रोल डीझल चे भाव गगनाला भिडले आहे असा टोलाही केंद्र सरकारला लगावला. मी ७ वर्षांपूर्वी जुन्नर येथील आपला आवाजच्या कार्यालयात आमचे मित्र किरण वाजगे सह गेलो होतो तेव्हाच अतुलसिह परदेशी यांनी जी स्वप्ने बोलून दाखवली होती ती आज सत्यात उतरत असल्याचे पाहून मला मनस्वी आनंद होत आहे याचीही आठवण व्यासपीठावर जुन्नर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अतुलसिह परदेशी यांचे मोठे बंधू दीपेशसिह परदेशी यांच्याकडे पाहून करून दिली. जेव्हा महिलांविषयी आपण बोलतो तेव्हा एक बाब लक्षात येते की आपला आवाज आपली सखीच्या माध्यमातून संगीता तरडे मॅडम यांनी ५० हजार महिलांचे एक भव्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले ही अभिमानस्पद बाब आहे. अतुल परदेशी यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या टीमचे खासदार अमोल कोल्हे यांनी विशेष कौतुक केले. व नूतन कार्यालयाच्या भव्य वास्तूत प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. आणि कार्यालयात जाऊन स्टुडिओ, एडिटिंग रूमची पाहणी करून त्यात होणाऱ्या कार्यक्रमांविषयी संगीता तरडे व रोहित खर्गे यांच्याशी चर्चा केली. आज माझ्या आई चा वाढदिवस असतानादेखील मी तिकडे न जाता इकडे जुन्नरच्या मातीशी नाळ जोडलेली असलेल्या लोकांसाठी इकडे आलो असेही बोलताना सांगितले.

मुख्य संपादक अतुलसिह परदेशी यांनी आपल्या प्रास्ताविकात आपला आवाजच्या वाटचलीविषयीचा प्रवास सांगितला. त्याचबरोबर आम्ही जेव्हा समाजहिताचे विषय मांडले तेव्हा वळसे पाटील साहेबांनी नेहमीच मार्गदर्शन केले. यापुढेही आमची बातमीदारी सकारात्मकच राहील असे सांगितले.यावेळी आपला आवाज आपला सखीच्या मध्यमातून महिला प्रतिनिधींचा सत्कार खासदार अप्पा बारणे, व डॉ अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला.

नूतन कार्यालयाच्या कार्यक्रमास शुभेच्छा देण्यासाठी शहरातील सर्वच स्तरातून मान्यवरांनी हजेरी लावली होती. शहराचे प्रथम नागरिक महापौर माई ढोरे, उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले, सत्ताधारी पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक समीर मासुळकर, माजी तीन उपमहापौर नगरसेवक तुषार हिंगे, केशव घोळवे, शैलजा मोरे, नगरसेवक हर्षल ढोरे, शैलेश मोरे, जेष्ठ नगरसेविका सुमन पवळे, शहर कॉग्रेस अध्यक्ष कामगार नेते डॉ कैलास कदम, माजी नगरसेवक जालिंदर बाप्पू शिंदे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, शिवसेना शहराध्यक्ष सचिन भोसले, वंचित बहुजन आघाडीचे देवेंद्र तायडे, कामगार नेते इरफान सय्यद, शिवसेना उपजिहाप्रमुख निलेश मुटके, दिशा फाउंडेशनचे अध्यक्ष जगन्नाथ उर्फ नाना शिवले, सचिव राजेंद्र करपे, उद्योजक बबूशेठ मुटके, लघु उद्योजक संघटनेचे उपाध्यक्ष संजय जगताप, शरीफ भाई शेख, गणेश लंगोटे, दिलीप दतीर पाटील, भाजप महिला प्रदेक्ष कोषाध्यक्षा शैला मोळक , कविता काळभोर, महिला राष्ट्रवादीच्या पिं चिं निरीक्षक उज्वला शेवाळे , कविता आल्हाट, ऍड शोभा कदम, साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले, कामगार नेते किशोर ढोकले, निवेदक श्रीकांत चौगुले , मुकुंदराज ढिले, प्रशांत पाटील, तुळसीदास शिंदे, कवी राजेंद्र वाघ, जुन्नर तालुका मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे, योगेश आमले, उल्हास पानसरे, नवनाथ नलावडे, दीपक सोनवणे, अण्णा मटाले, लायन मलशेट्टी, इंद्रायणी सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब गव्हाणे, बाळासाहेब मोळक, इलेक्ट्रॉनिक मिडीया ,प्रिंट मीडिया आणि पोर्टल न्यूज चॅनलचे पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जेष्ठ पत्रकार नाना कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले. तर आभार संगीता तरडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *