दिल्ली येथून निघालेल्या स्वर्णीम ज्योतीचे राहाटणीत, पिंपळे सौदागर येथे स्वागत

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०४ ऑक्टोबर २०२१

पिंपळे सौदागर

विजय दिवस केवळ 1971 मध्ये पाकिस्तानवर भारताच्या नेत्रदीपक विजयाचे स्मरण करत नाही तर बांगलादेशच्या जन्माची कथा देखील सांगतो. भारतीय सैन्याने 1971 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या झालेल्या युद्धात “स्व. इंदिराजीं गांधीच्या फौलादी इरादों के आगे” पाकिस्तान सैैन्यानेे भारतापुढे गुडघे टेकले. आणि बांगलादेश जगाच्या नकाशावर आला.

१ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी सैन्याने भारताला आत्मसमर्पण केले आणि त्यानंतर बांगलादेश जगाच्या नकाशावर जन्मला. आज आपण हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करतो. या विजय दिवसाला ५० वर्षे पूर्ण झाल्यामुळे हा दिवस ‘स्वर्णिम दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे.

दिल्लीमधून निघालेल्या या ‘स्वर्णिम ज्योती’चे रहाटणी – पिंपळे सौदागर येथे रोझलँड रेसिडेन्सी सोसायटी व तसेच एस. एन. बी. पी.स्कूल येथे आगमन झाले. या स्वर्णिम ज्योतीचे स्वागत मा. विरोधी पक्षनेते, नगरसेवक श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्यासमवेत रोज लँड सोसायटीचे चेअरमन संतोष मसकर, आनंद दप्तरदार,रमाकांत, सोसायटीतले कमिटी मेंबर व रहिवासी तसेच एस. एन. बी. पी. स्कूलमध्ये स्कूलचे चेअरमन श्री.डी. के. भोसले व , स्कूलच्या प्राध्यापक व्यंकट रमण मॅडम प्रिन्सिपल, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *