बारामतीचे वातावरण होणार गरम. किरीट सोमय्या ६ ऑक्टोबरला बारामतीला जाणार.

राजू थोरात
सांगली जिल्हा प्रतिनिधी
०४ ऑक्टोबर २०२१

बारामती

तासगाव तालुक्यातील वंजावाडीचे बजरंग खरमाटेंच्या मालमत्तेची करणार पाहणी

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या काही मंत्र्यांवर विविध प्रकरणांवरून ईडी, सीबीआयची कारवाई सुरू आहे. किरीट सोमय्या महाविकास आघाडीतील एकेका मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत तक्रार दाखल करत आहेत. परिवहनमंत्री अनिल परब यांचे तात्कालीन सहायक व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तासगाव तालुक्यातील वजांरवाडीचें बजरंग खरमाटे यांची बारामती तालुक्यातील रुई येथील कथित मालमत्ता पाहण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या येत्या ६ ऑक्टोबर रोजी बारामतीत जाणार आहेत.

तासगाव तालुक्यातील वजांरवाडीचे अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या मागचे शुक्लकास्ट थांबेना.

भाजपचे जिल्हा सरचिटणीकिरीट सोमय्या 6 ऑक्टोबरला बारामतीला जाणार बजरंग खरमाटेंच्या मालमत्तेची करणार पाहणीस अविनाश मोटे आणि शहर अध्यक्ष सतिश फाळके यांनी या संदर्भात आज माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दौरा मागील वेळीप्रमाणेच असणार आहे. काही दिवसांपूर्वी सोमय्या यांचा बारामतीचा नियोजित दौरा होता. मात्र तो दौरा ऐनवेळी रद्द झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार त्याच दिवशी त्यांना केंद्र सरकारने झेड सुरक्षा दिल्यानंतर त्यांच्या दौऱ्याची आयत्या वेळी आखणी झाली नाही.

रुई येथील संबंधित मालमत्तेची पाहणी करणार

खरमाटे यांच्या कथित मालमत्तेची कागदपत्रेही काढण्यात विलंब झाला होता. आता त्यांना या मालमत्तेची संपूर्ण कागदपत्रे देण्यात आली असून त्यांचा येत्या ६ ऑक्टोबर रोजी नियोजित दौरा असणार आहे. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ते जरंडेश्वर कारखान्याची पाहणी करून बारामतीत पोचणार आहेत. त्यानंतर ते रुई येथील संबंधित मालमत्तेची पाहणी करणार आहेत. तेथून ते भाजपच्या बारामतीतील कार्यालयात पत्रकारांशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे.

“मला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसबाबतचीही माहिती मिळत असते”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये ११ भ्रष्टाचारी नेते आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती मला कुठून येते हे मी तुम्हाला का सांगू? मला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसबाबतचीही माहिती मिळत असते. आता ११ ऐवजी २० मंत्र्यांची नावे लवकरच समोर येतील, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.खरमाटे यांच्या अडचणीत वाढ होणार हे मात्र नक्की आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *