गदिमा सन्मान हा माझ्यासाठी अनमोल ठेवा आहे- जेष्ठ संगीतकार श्रीधर फडके

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२ ऑक्टोबर २०२१

पुणे

गदिमांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद, गदिमा कुटुंबीय आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या वतीने २९ व्या राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सवाचे आयोजन मसाप पुणे येथे करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ साहित्यिक रामचंद्र देखणे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत जेष्ठ संगीतकार, गायक श्रीधर फडके यांना ” जीवनगौरव सन्मान ” प्रदान करण्यात आला.

सन्मानाला उत्तर देताना, गदिमा चित्रकवी होते. त्यांच्या आणि बाबूजींच्या सहवासात माझे आयुष्य समृद्ध झाले. ” गदिमा सन्मान हा माझ्यासाठी एक अनमोल ठेवा आहे.” आशा भावना जेष्ठ संगीतकार, गायक श्रीधर फडके यांनी वेक्त करत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात बाबूजींचा विवाह झाला. त्यावेळी महंमद रफी मंगलाष्टके गाण्यासाठी आले होते. माझ्या लग्नाचा स्वागत समारंभही याच सभागृहात झाला. आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी गदिमा सपत्नीक आले होते. भावनिक नाते असलेल्या या सभागृहात मला गदिमा जीवसनगौरव सन्मान मिळाला हा भावुक करणारा क्षण आहे.

Poet Engg. Shivaji Chalak felicitated
कवी इंजि. शिवाजी चाळक यांचा सत्कार यांचा सत्कार म.सा.प. चे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर, नारायण सुर्वे कला अकादमीचे अध्यक्ष व या समारंभाचे स्वागताध्यक्ष उद्योजक सुदाम भोरे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रा. मिलिंद जोशी यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले, ” गदिमा आणि बाबूजींचे जीवन हा सर्जनांचा महोत्सव होता.” तर गीतरामायणामुळे गदिमा महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी झाले. स्वरतीर्थ होण्याचे भाग्य सुधीर फडके याना लाभले. दोघांनी मिळून भावभक्तीचे पावनतीर्थ निर्माण केले. गीतरामायणामुळे महाराष्ट्राची श्रवनसंस्कृती श्रीमंत झाली. गीतरामायण पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी श्रीधर फडके यांनी मोठे योगदान दिले आहे. गदिमा हे महाराष्ट्राचे विदग्ध महाकवी आहेत. गीतरामायण हेच गदिमांचे चिरंतन स्मारक आहे असे मनोगत जेष्ठ साहित्यिक रामचंद्र देखणे यांनी वेक्त केले.

Gadima Kavya Pratibha Award presented by Senior Literary Writer Ramchandra Dekhane to Poet Sangeeta Zinjurke
जेष्ठ साहित्यिक रामचंद्र देखणे यांच्या हस्ते गदिमा काव्यप्रतिभा पुरस्कार स्वीकारताना कवयत्री संगीता झिंजूरके

यावेळी गदिमा स्नेहबंध पुरस्कार साहित्यातील व्यासंग वेक्तिमत्व नंदकुमार मुरडे, गदिमा काव्यप्रतिभा पुरस्कार कवियत्री संगीता झिंजूरके, यांना सन्मानित करण्यात आले.
गदिमा साहित्य पुरस्कार – नाशिक येथील कवी प्रशांत केंदळे यांच्या गुलमोहराचे कुकू, जुन्नर येथील कवी इंजि. शिवाजी चाळक यांच्या जंगल दंगल , तर कोपरगावचे राजेंद्र उगले यांच्या थांब ना रे ढगोबा या साहित्य निर्मिती करणाऱ्या साहित्यिकांचा सन्मान मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. तर गदिमांचे वारसदार कवी म्हणून डॉ नीलम गायकवाड आणि सरला पाटील यांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले (मामा) यांनी केले.
सूत्रसंचालन कवीराज उद्धव कानडे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार मुरलीधर साठे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *