नाना काटे सोशल फाऊंडेशनचा कोकणातील पूरग्रस्तांना एक हात मदतीचा

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२९ सप्टेंबर २०२१

पिंपरी

एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत निसर्गाच्या संकटाला धैर्याने तोंड देणाऱ्या कोकणामधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांना अन्नधान्य व जीवनोपयोगी वस्तू द्वारे नाना काटे सोशल फाउंडेशन तर्फे मदत करण्यात आली.

जीवनावश्यक वस्तु घेवुन ट्रक चिपळूणच्या दिशेने रवाना करण्यात आला. ही मदत चिपळूणचे जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. या प्रसंगी मा. विरोधी पक्षनेते तथा विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे , माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, राज कोठारी, अविनाश गायकवाड, प्रशांत देवकाते, कुंदन कातुरे, शाहरूख शेख आदि उपस्थित होते.

Nana Kate Social Foundation helping the flood victims in Konkan
नाना काटे सोशल फाऊंडेशनचा कोकणातील पूरग्रस्तांना एक हात मदतीचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *