अटल बिहारी वाजपेयी विचार मंच व समर्थ दिव्यांग सेवा संस्था मार्फत दिव्यांगांना साहित्य वाटप…


अटल बिहारी वाजपेयीं विचार मंच पुणे जिल्हा व समर्थ दिव्यांग सेवा संस्था संघटना आंबेगाव तालुका जिल्हा पुनर्वसन केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे आज मंगळवार रोजी दिव्यांग शिबीर नाव नोंदणी व साहित्य वाटप करण्यात आले या शिबिरात 200 दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला.

या वेळेस 30 दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमांमध्ये दिव्यांग व्यक्तींना रोजच्या वापरात लागणारे साहित्य पिक्चर कुबड्या, कानाची मशीन, वॉकर काठी, जयपुर फुट, कॅलिपर देण्यात येणार असून या दिवशी कॅलिपर्स व जयपूर फूट लागणाऱ्या दिव्यांग व्यक्तींची पायाची ची मोजमापे घेण्यात आली या कार्यक्रमास भाजप जिल्हा अध्यक्ष, गणेश भेगडे,तालुकाध्यक्ष, डॉ ताराचंद कराळे,संपर्क प्रमुख,जयशिंग शेठ एरंडे,जेष्ठ पत्रकार डी के वळसे,उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ अंबादास देवमाणे अटल मंच चे संस्थापक संदीप बाणखेले, कार्याध्यक्ष नवनाथ थोरात, कल्पेश अप्पा बाणखेले, समर्थ दिव्यांग संस्था अध्यक्ष सुनील दरेकर,समीर टाव्हरे, गणेश बाणखेले,रोहन खान्देशे, प्रकल्प संचालक अशोक सोळंके, नसीम खान उपस्थित होते उत्तर पुणे जिल्ह्यातील अनेक दिव्यांग बांधव यांनी सहभाग घेतला या वेळी जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांनी मनोगत व्यक्त करताना अटल बिहारी वाचपेयीं संस्थेच्या पदाधिकारी यांचे कामाचे कौतुक केले सामाजिक कार्यात काम करताना दिव्यांग बांधव यांचे देशासाठी योगदान मोलाचे आहे असे सांगितले डॉ ताराचंद कराळे यांचे माध्यमातून अटल वैद्यकीय कक्ष मार्फत अनेक नागरिकांचे शस्त्रक्रिया अल्पदरात करून देत असल्याचे भेगडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *