महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट राज्यस्तरीय अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट महिला संघाला तृतीय क्रमांक

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२८ सप्टेंबर २०२१

नाशिक

महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५ वी खुला गट राज्य अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत पिंपरी चिंचवड महिलांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकवला . सेमी फायनल मध्ये ठाणे संघाबरोबर खेळताना अमिषा पाटील हिने शिलेदार व आक्रमक फलंदाजी केली पण तिची खेळी अपुरी पडली. ठाणे संघाकडून आफ्रिन ने धडाकेबाज फलंदाजी करून पिंपरी चिंचवड संघावर मात ७ धावांनी विजय मिळवला.

तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात सिंधुदुर्ग संघावर अमिषा पाटील ने आक्रमकतेने फलंदाजी करत १० धावांनी पराभव केला. यावेळी अनुजा मोरे व संचिता सोनवणे यांनी टिच्चून गोलंदाजी करत अमिषा ला साथ दिली.

महिला कर्णधार अमिषा पाटीलच्या मार्गदर्शनाखाली संघाने तृतीय क्रमांक मिळवला आहे . अमिषा पाटील , माधुरी बनसोडे , अचला गावडे , श्वेता साळूंखे ह्यांनी उत्कृष्ट अशी फलंदाजी केली आहे .अनुजा मोरे , संचिता सोनावणे ह्यांनी छान गोलंदाजी केली .तसेच श्रद्धा आव्हाड , मधुरा बाफना , साक्षी महाजन , साक्षी सरदार , सिया सूर्यवंशी ह्यानी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले . या सर्व खेळाडूंना डॉ डी वाय पाटील पब्लिक स्कूलच्या क्रीडा शिक्षिका पार्वती बाकळे ह्यांचे मार्गदर्शन लाभले.

Pimpri Chinchwad Tennis Cricket Women's Team Wins 3rd in Maharashtra State Tennis Cricket State Level Championship
महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट राज्यस्तरीय अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट महिला संघाला तृतीय क्रमांक

महाराष्ट्रातील मुलींच्या 8 संघानी या राज्य स्पर्धेत भाग घेतला होता. तसेच पिंपरी चिंचवड मुलींच्या संघाने नाशिक , सिंधुदुर्ग ग्रामीण , सिंधुदुर्ग शहर या सर्व जिल्हांना हरवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे .या सर्व स्पर्धा 24 सप्टेंबर 2021 ते 26 सप्टेंबर 2021 रोजी तालुका क्रीडा संकुल , नाशिक येथे संपन्न झाल्या .

पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी मृदुला महाजन , तुषार हिंगे ,सुनीता फडके , ऐश्वर्या साठे यांनी यशश्वी खेळाडूंचे अभिनंदन करून  पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. या सर्व स्पर्धा महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट महासचिव मीनाक्षी गिरी यांच्या देखरेखेखाली संपन्न झाल्या .

कोरोनाच्या संसर्ग कमी झाल्यावर खेळाची मैदाने सुरू झाली की भविष्यात पिंपरी चिंचवड मध्ये माजी उपमहापौर नगरसेवक तुषार हिंगे व माजी क्रीडा सभापती समीर मासुळकर यांच्या सारख्या क्रीडा क्षेत्रात आवड असणाऱ्या नगरसेवकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर टेनिस क्रिकेट स्पर्धा भरवण्याचा मानस पार्वती बाकळे यांनी आपला आवाजकडे बोलून दाखवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *