चोरीला गेलेले सोन्याचे दागिने फिर्यादी महीलेस परत

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
२५ सप्टेंबर २०२१

नारायणगाव 

चोरीला गेलेले सोन्याचे दागिने फिर्यादी महीलेस परत मिळाल्याची घटना नारायणगाव येथे घडली आहे.

नारायणगाव पोलिस ठाण्यात भा.द.वि. कलम ४५४,३८० अन्वये दाखल गुन्ह्यांचा तपास करत असतांना सदरचा गुन्हा पुणे आयुक्तालयाच्या हद्दीमधील भारती विद्यापीठ पोलीस ठाणे गु.र.नं .५४३ / २०२१ , भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८० मधील अटक आरोपी नामे १ ) युवराज अर्जुन डोणे , वय २६ वर्षे , २ ) अविनाश अर्जुन डोणे , वय २१ वर्षे , दोन्ही रा.निरजगाव कवडेवस्ती , ता.कर्जत , जि.अहमदनगर , यांनी केलेबाबत संशय असल्याने त्यांना नारायणगाव पोलीस स्टेशन कडील वरील दाखल गुन्हयात मा कोर्टाच्या आदेशाने ताब्यात घेऊन त्यांचेकडे गुन्हयाचा तपास केला असता , त्यांनी नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोल्हेमळा येथील फिर्यादी वनिता सुधाकर विटे यांचे घरातुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केली असल्याची कबुली दिली आहे. त्यातील रोख रक्कम त्यांनी खाण्यापिण्यासाठी खर्च झाली असल्याचे सांगून सोन्याचे मंगळसुत्र व कानातील टॉप्स हे त्यांनी आरोपी ३ ) निलेश कुंदनमल झाडमुथ्या , वय ३८ वर्षे , रा.डोगरगण , ता.आष्टी , जि.बीड , यांना विकत दिले असून त्यांचेकडुन सोन्याचे मंगळसुत्र व टॉप्स हे निलेश कुंदनमल झाडमुथ्या यांचेकडुन हस्तगत केले आहे.

नारायणगाव पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी

तसेच सदर गुन्हयातील आरोपी नामे निलेश कुंदनमल झाडमुथ्या , यास सोन्याचे दागिने हे चोरीचे आहेत हे माहित असतांना सुध्दा त्याने आरोपी नामे १ ) युवराज अर्जुन डोणे , वय २६ वर्षे , २ ) अविनाश अर्जुन डोणे (वय २१ वर्षे , दोन्ही रा . निरजगाव कवडेवस्ती ता.कर्जत , जि.अहमदनगर) यांचे कडुन खरेदी केले असुन आरोपी यांनी सदरचा गुन्हा संगनमताने केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे . त्यामुळे सदर गुन्हयास भा.द.वि. कलम ४११,३४ हे वाढीव कलम लावण्यात आलेले आहे . सदर गुन्हयातील आरोपींकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल १ ) २,१६,००० / -रूपये किंमतीचे एक सोन्याचे मंगळसुत्र दोन्ही बाजूंनी चैन पट्टया व दोन वाटया असलेले वजन अंदाजे ४८ ग्रॅम , २ ) २२,५०० / -रूपये किंमतीचे एक जोड सोन्याचे कानातील टॉप्स वजन अंदाजे ५ ग्रॅम , असा मुद्देमाल मा.कोटे साहेब, जुन्नर यांचे कडील आदेशान्वये फिर्यादी यांचे ताब्यात देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *