मी दाव्याने सांगतो मी या शहरात केव्हाच खालच्या दर्जाचे राजकारण केले नाही. नेहमी विकासाचे व्हिजन घेऊनच काम करत राहिलो – उपमुख्यमंत्री अजित पवार

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१७ सप्टेंबर २०२१

आकुर्डी

Deputy Chief Minister Ajit Pawar inaugurated the Gyan Shanti School at Akurdi
आकुर्डी येथील ज्ञानशांती शाळेचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासोबत त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. आकुर्डी येथील ज्ञानशांती शाळेचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना

सत्तेचा वापर त्यांनी कशाप्रकारे केला हे जनतेने पाहिले

आम्हीं नेहमीच विकासाचे व्हिजन घेऊनच काम करत राहिलो. आज कितीतरी नगरसेवक भाजपचे असले तरी आमच्या पक्षाच्या माध्यमातूनच मी त्यांना संधी दिली होती. मी त्यांना पदे दिली होती. चढउतार येत असतो त्यावेळी नरेंद्र मोदी साहेबांची जबरदस्त देशात हवा होती. महराष्ट्रात सत्ता भारतीय जनता पार्टीकडे होती. आणि सत्तेचा वापर त्यांनी कशाप्रकारे केला हे जनतेने पाहिले. आता पूर्णपणे पोलीस यंत्रणा आमच्याकडे दिलीपराव वळसेपाटील यांच्याकडे असल्याने पूर्वीचा आढावा घेत असताना वॉर्ड रचना करताना त्यांनी आमच्या कोणकोणत्या नगरसेवकांना त्रास होईल व सोयीचे वॉर्डरचना एक चे बदलून चारचे करून कुठला भाग काढायचा कुठला ठेवायचा ते करून घेतले. तेव्हा मी आमच्या नगरसेवकांना सांगत असे ‘ अरे वॉर्डरचनेत काय असते’ शेवटी आपण चांगले काम केले तर लोक निवडून देतात. मी दाव्याने सांगतो की एव्हड्या खालच्या दर्जाचे राजकारण मी केव्हाच केले नाही.

भाजपचे किती नगरसेवक तुमच्या संपर्कात आहेत? “माझ्या संपर्कात खूप नगरसेवक आहेत.” – उपमुख्यमंत्री अजित पवार

‘भाजपचे किती नगरसेवक तुमच्या संपर्कात आहेत?’ असे विचारल्यावर दादा म्हणाले माझ्या संपर्कात खूप नगरसेवक आहेत. पण आता जर ते आमच्या पक्षात आले तर अपात्र व्हायला नको. पक्षांतर बंदीमुळे सहा वर्षासाठी अपात्र होतील. आणि जे आले ते स्वतः आले नाहीत त्यांची पत्नी नागरसेविका असेल तर पती आले. व ज्यांना तांत्रिकदृष्ट्या प्रॉब्लेम नाही ते अपक्ष नगरसेवक आले आहेत. शेवटी आम्हीच त्यांना संधी देऊन पुढे आणले आणले होते. जेव्हा आमची सत्ता होती तेव्हा असलेल्या आयुक्तांना मग ते दिलीप बंड असो, श्रीकर परदेशी असो तेव्हा इतर पक्षातील नगरसेवकांना मदत व्हायला पाहिजे असे सांगत असे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस त्यांना शुभेच्छा दिल्या? ते देशाचे पंतप्रधान आहेत मी त्यांना ट्विट करून सकाळीच शुभेच्छा दिल्या नंतर प्रेसनोट पण काढली आणि तुम्ही म्हणत असाल तर आता तिसऱ्यांदा तुमच्या माध्यमातून परत शुभेच्छा देतो असे मिश्किलपणे स्मितहास्य करत म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *