आळ्यात ग्रामसेवक, सरपंच रस्त्यावर; गावाला स्वच्छतेचा दिला मूलमंत्र

रामदास सांगळे

विभागीय संपादक

दि. १६ सप्टेंबर २०२१

जुन्नर

जुन्नर l जिल्हा परिषद पुणे अंतर्गत महा स्वच्छता अभियान व महाश्रमदान दिवस पुणे जिल्हात राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त ग्रामपंचायत आळे (ता.जुन्नर) परिसरात महास्वच्छता करण्यात आली. गावचे सरपंच प्रीतम काळे, ग्रामसेवक बाळासाहेब वणघरे,पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, सदस्य,सर्व सफाई कर्मचारी, नागरिक यांनी रस्त्यावर उतरून गावात स्वच्छता केली.

सरपंच व ग्रामसेवकाने श्रमदानातून गावाला स्वच्छतेचा दिला मूलमंत्र

यावेळी ग्रामस्थांना गाव व परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.गावातील केरकचरा, प्लॅस्टिक गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. तसेच रस्ते झाडून स्वच्छ केले.त्यानिमित्ताने विस्तार अधिकारी आरोग्य चव्हाण, सर्व ग्रामपंचायत सदस्य, दिगंबर घोडेकर,अर्चना गुंजाळ, ज्योती शिंदे,मंगला तितर, सखाराम भंडलकर,सविता भुजबळ, सुधाकर काळे, गौरी भंडलकर, जयश्री डावखर,राजाउद्दीन मोमीन,लता वाव्हळ, सोनाली वाघोले,उर्मिला कुऱ्हाडे, यांसह आदी मान्यवर या अभियानात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *