निमगावसावात उभारलं जातंय ‘आयुर्वेद वन’

रामदास सांगळे
विभागीय संपादक, जुन्नर
१५ सप्टेंबर २०२१

महिला बचत गटाच्या माध्यमातून २४० आयुर्वेदिक झाडांची लागवड

निमगाव सावा (ता.जुन्नर) येथील ‘क’ वर्ग दर्जा चे पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झालेल्या खंडोबा डोंगरा वरती महिला बचत गट तसेच सरपंच किशोर घोडे यांच्या माध्यमातून २४० आयुर्वेदिक झाडांची लागवड करण्यात आली.

जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच्या माध्यमातून निमगाव सावा गावातील खंडोबा डोंगर ‘क’ दर्जाचे पर्यटन क्षेत्र म्हणून घोषीत झाले. त्यामुळे येथे पर्यटकांना आकर्षित करतील असे खूप छोटे मोठे उपक्रम राबवले गेले आहेत. त्यातच मंगळवार (दि.१४) रोजी खंडोबा डोंगरावर आयुर्वेदिक वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यासाठी विशेष अस सहकार्य डेव्हलोपमेंट सपोर्ट सेंटर (आळेफाटा ,नारायणगाव) या संस्थेचे टीम लीडर भरत राऊत, प्रशांत साळवे, ग्रामपंचायत निमगाव सावा सरपंच किशोर घोडे व निमगाव सावा गावातील महिला बचत गटाच्या सहकार्यातून लागवड करण्यात आली. जवळपास ८० प्रकारची प्रत्येकी ३ म्हणजे २४० आयुर्वेदिक झाडे लावली. ज्याला ‘आयुर्वेद वन’ हे नाव भविष्यात दिल जाईल अशी माहीती निमगाव सावा गावचे सरपंच किशोर घोडे यांनी दिली.

Planting of 240 Ayurvedic trees through Mahila Bachat Group
महिला बचत गटाच्या माध्यमातून २४० आयुर्वेदिक झाडांची लागवड

रोजी खंडोबा डोंगरावर आयुर्वेदिक वृक्षांची लागवड करण्यात आली

या उपक्रमासाठी विशेष असे प्रयत्न करणारे संदीप थोरात संस्थापक धर्मवीर छावा प्रतिष्ठान यांनी सर्व महिलांचे आभार मानले. तसेच भविष्यात देखील बचत गटांच्या सहकार्यातून संपूर्ण खंडोबा डोंगर हिरवागार व पर्यटकाना आकर्षित करेल अश्या पद्धतीचे नियोजन असणार आहे. त्या कामी सर्व गावकऱ्यांचे सहकार्य असले पाहिजे असे देखील सरपंचांनी या वेळी नमूद केले.

डोंगर हिरवागार झाला तर लोकांची वर्दळ वाढणार आहे.ज्यातून गावातील तरुणांना निश्चित पने रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *