आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंतीसाठी प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर, नितेश राणेंसह दिग्गज १३/०९ ला शिरुरला येणार – दौलत नाना शितोळे


बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर : दि. १२/०९/२०२१

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३० व्या जयंतीचा कार्यक्रम, शिरूर शहरात सोमवार दि. १३ सप्टेंबर २०२१ रोजी, साई गार्डन मंगल कार्यालय, सी टी बोरा कॉलेज रोड, शिरूर येथे ११.३० वा. होणार असल्याचे, जय मल्हार क्रांती संघटना, महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष तसेच रामोशी, बेरड, बेडर व तत्सम समाजाचे नेते दौलत नाना शितोळे यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत, तर कार्यक्रमाचे उद्घाटक विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, कार्यक्रमाचे मार्गदर्शक शिरूर – हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे असणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थितांमध्ये भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, खासदार गिरीश बापट, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार नितेश राणे, माजी मंत्री बाळा भाऊ भेगडे, माजी मंत्री बबन पाचपुते, आमदार सदाभाऊ खोत, आमदार रामभाऊ सातपुते, आमदार अभिमन्यू पवार, आमदार महेशदादा लांडगे, आमदार राहुल कूल, आमदार महेश शिंदे, माजी आमदार योगेश टिळेकर, माजी जी प अध्यक्ष प्रदीपदादा कंद, भाजप चे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, पुणे शहाराध्यक्ष जगदीश मुळीक, अ. भा. वि. जा. ज. नवी दिल्ली चे कार्याध्यक्ष डॉ. आदित्य पतकराव, शीवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष माऊली कटके, कुस्तीगीर संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष पै. संदीप आप्पा भोंडवे, जी. प. सदस्या रेखाताई मंगलदास बांदल, भाजपा उद्योग आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे, उद्योजक राजेंद्र जासूद, भाजप चे शिरूर तालुकाध्यक्ष दादापाटील फराटे, शिवसेना तालुकाध्यक्ष सुधीर फराटे, पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके असणार आहेत. कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक हाजी रुस्तुम सय्यद व सतीश घोलप असणार आहेत.
शिरूर तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या गरम असुम खूप ढवळून निघत आहे. आठवड्याभरापूर्वी शिक्रापूर येथे शीवसेनेचा कार्यकर्ता मेळावा झाला. त्यासाठी शिवसेनेचे दिग्गज नेते व खासदार संजय राऊत आले होते. त्यांनी शिरूर तालुक्यातील व पुणे जिल्ह्यातील काही आमदारांविषयी नाराजी व्यक्त करत, त्यांच्याबद्दल मुख्यमंत्री व महाविकास आघाडीतील मित्र पक्षातील वरिष्ठांशी बोलणार असल्याचे स्पष्ट केले होते. संजय राऊत हे पुणे जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्ता मेळाव्याला आले होते, तेथील कार्यक्रमांचे आयोजकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. परंतु त्या त्या कार्यक्रमांमध्ये, संजय राऊत यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहन देत ताकद देत जाहीर भाषणात स्थानिक आमदारांविषयी नाराजी व्यक्त केली होती.
शिरूरच्या कार्यक्रमालाही भाजप चे अनेक दिग्गज नेते प्रत्यक्ष तर काही नेते मंडळी ऑनलाइन हजेरी लावत आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजक दौलत नाना शितोळे हे भाजप समर्थक मानले जात असून, त्यांनी अलीकडेच शिरूर हवेलीचे आमदार हे शितोळे यांना व त्यांच्या संघटनेला त्रास देत असून, त्यांचे मच्छीमारीचे ठेके व कंपन्यांमधील ठेके काढून घेऊन, आपल्या स्वकीयांना देत असल्याचे, जाहीरपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली होती. त्याच पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील राजकारण आता खूप ढवळू लागले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व इतर निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून, या सर्व घडामोडी घडत असल्याचे बोलले जात आहे.
शिरूरच्या कार्यक्रमात गोपीचंद पडळकर, नितेश राणे व प्रवीण दरेकर हे स्वतः उपस्थित राहून, उपस्थितांना मार्गदर्शन करणार असल्याने आता या सभेत आणखी काय काय आगपाखड होतेय, या कडेच सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *