ओझर येथे झाला ‘’श्रींचा” जन्मोत्सव सोहळा संपन्न…

ओझर प्रतिनिधी :- मंगेश शेळके

दि.१० सप्टेंबर २०२१ (ओझर) :-भाद्रपद चतुर्थी श्री जन्मोत्सव सोहळ्याच्या चौथ्या दिवशी गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ५ .०० वा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष,श्री गणेशभाऊ कवडे ,उपाध्यक्ष अजित कवडे,सचिव दशरथ मांडे,खजिनदार कैलास घेगडे विश्वस्त बी.व्ही.अण्णा मांडे,रंगनाथ रवळे,आनंदराव मांडे,किशोर कवडे,मंगेश मांडे,गणपत कवडे,मिलिंद कवडे, श्रीराम पंडित,कैलास मांडे,विजय घेगडे,राजश्री कवडे यांचे हस्ते ‘श्री’स महाअभिषेक करून मुख दर्शनासाठी सुरुवात करण्यात आली. द्वार यात्रेतील पहिल्या द्वारापासून चौथ्या द्वारयात्रेपार्यंत पालखी मिरवणूक न करता देवस्थान ट्रस्ट च्या वाहनातून द्वार यात्रा संपन्न करण्यात आली.

दररोज पुणे येथील प्रसिद्ध सनई चौघडा वादक दिनेश मावडीकर यांनी वादन केले. चौथ्या द्वारासाठी ओझर येथील आंबेराई येथे जाण्यासाठी १० वा देवस्थान ट्रस्ट च्या वाहनातून देवभेट करण्यासाठी आंबेराई येथे पृथ्वी सुर्य पूजा करून मोरया गोसावी यांचे पदांचे गायन करून आरती करून ११.५५ मिनिटांनी वाहनातून मंदिराकडे आगमन झाले. या द्वार यात्रेत देवस्थान ट्रस्ट च्या विश्वस्त सौ राजश्रीताई कवडे त्यांच्या इतर सहकारी तसेच कर्मचारी महिला यांनी जागोजागी रांगोळी काढून इतर ग्रामस्थांनी ,फुलांचा सडा.अल्पोपहार चहा प्रसादाची व्यवस्था केली होती .


कोविड रोगाचे वाढते प्रमाण असल्याने देवस्थान ट्रस्ट ने भाविकांसाठी व देवस्थान ट्रस्ट च्या कर्मचारी वर्गासाठी मास्क, सेनीटायझर , तसेच वेळोवेळी कोविड बाबत सूचना देण्यात येत होत्या . दिलेल्या सूचनांचे भाविकांनी तंतोतंत पालन केले. देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिर चौकात बसण्यासाठी मॅट,दर्शनरांग संपूर्ण मंदिरात स्क्रीनची व्यवस्था, लाईट डेकोरेशन,देवजन्मासाठी फुलांची उधळण करण्यासाठी फुलांचे वाटप इत्यादी व्यवस्था होती.फुलांची उधळण करून पंदाचे गायन होवून पुष्पवृष्टी करून १२ वाजून ३०.मिनिटांनी देवजन्म साजरा झाला. सामुहिक आरतीसाठी कर्मचारी वृंद, अध्यक्ष व विश्वस्त उपस्थित होते. भाविकांचे स्वागत भालदार चोपदार यांनी “ बडे जय महाराज कि जय मेहरबान राम राम ,जयहिंद भारतमाता कि जय” असा जयघोष केला .सर्व कार्यक्रमाचेLIVE प्रसारण मंदिरचौकात करण्यात आले .मंदिरात फुलांची सजावट ग्रामस्थ रोहिदास हनुमंत मांडे यांनी मोफत केली. या कार्यक्रमात विघ्नहराच्या मानलेल्या बहिणी जेथे द्वार यात्रा जाते ते शिरोली खु!! धनेगाव व उंब्रज ग्रामस्थांनी देवीचा आहेर म्हणून भरजरी वस्त्र भेट दिली. या आहेराची सवाद्य मिरवणूक काढून देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री गणेशभाऊ कवडे यांनी ग्रामस्थांचा सत्कार केला.सायं ५.०० वा शेरणी म्हणून सार्वजनिक प्रसाद पेढे वाटप करण्यात आले प्रत्येक घरातून कमीत कमी सव्वा किलो पेढे वाटप केले गेले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *