सौ.संगिता ढमाले यांना राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्कार

किरण वाजगे,
कार्यकारी संपादक

नारायणगाव

शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर २०२१ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बस्ती (ता. जुन्नर) च्या उपशिक्षिका संगिता बाळासाहेब ढमाले यांनी शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तसेच अध्यापनामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे त्यांना हा सन्मान राज्यस्तरीय शैक्षणिक दीपस्तंभ तर्फे देण्यात आला.

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त नेते आपल्या भेटीला हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात ऑनलाइन राबवला.

त्यांनी राबवलेले शैक्षणिक , सामाजिक, राष्ट्रीय उपक्रम पुढील प्रमाणे –
२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन तालुक्यातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी साजरा केला.अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त नेते आपल्या भेटीला हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात ऑनलाइन राबवला.
उदा. वेशभूषेसह – पंडित नेहरू, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर इ. ऍक्टिव्ह टीचर्स जुन्नर आयोजित दर शनिवारी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी ऍक्टिव्हिटी घेतली जाते. त्यामध्ये शनिवार फनीवार उपक्रमांतर्गत एरोबिक्स आणि मेडिटेशन ,पर्यावरण पूरक उपक्रम – राखी बनवणे, इको फ्रेंडली गणपती बनविणे, कुंडीतील वृक्षारोपण. झेडपी लाइव्ह एज्युकेशन अंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून “घरात सुरू झाली ऑनलाइन शाळा” यामध्ये पाठांचे पीपीटी द्वारे उत्कृष्ट सादरीकरण. झेडपी लाईव्ह च्या माध्यमातून नवरात्रौत्सव ठरला टेक्नोत्सव यामध्ये देखील झूम मीटिंग आणि गूगल मिटिंगची राज्यस्तरीय सर्व शिक्षकांना माहिती देण्यात आली.

संपूर्ण जुन्नर तालुक्यातील शिक्षकांना ऑनलाईन झूम ट्रेनिंग दिले.

लॉकडाऊन च्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन वर्गाला सुरुवात केली. संपूर्ण जुन्नर तालुक्यातील शिक्षकांना ऑनलाईन झूम ट्रेनिंग दिले. यूट्यूब चैनल वर स्वनिर्मित व्हिडिओ निर्मिती विद्यार्थ्यांसाठी केली आहे. जिल्हा स्तरीय शिक्षण परिषद मध्ये सहभाग घेऊन केंद्रस्तरीय ऑनलाईन शिक्षण परिषदांचे आयोजन केले आहे.थँक्स अ टीचर स्पर्धा तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या स्पर्धांमध्ये भाग घेऊन विद्यार्थ्यांनी नैपुण्य मिळवले आहे.

सामाजिक व राष्ट्रीय उपक्रमा मध्ये आर्ट ऑफ लिविंग च्या माध्यमातून ढमाले यांनी योगा , प्राणायाम आणि ध्यान प्रशिक्षण ,कोविड केअर प्रोग्रॅम ,पोस्ट कोविड प्रोग्राम ईमिनीटी बूस्टर प्रोग्रॅम आदी विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनात्मक प्रोग्रॅम राबविले. तसेच शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे ही राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ई पुरस्कार २०२१ देवून संगिता ढमाले यांना सन्मानित करण्यात आले आहे.

पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी किसन खोडदे ,परिविक्षाधीन गटशिक्षणाधिकारी दीपक कोकरे, विस्ताराधिकारी आनिता शिंदे व गुंजाळवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख किशोर दगडे यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *