भाजपा त शिरूरच्या अनेक महिला पदाधिकऱ्यांचा प्रवेश : शिवसेनेच्या माजी पदाधिकऱ्यांचा यात समावेश : आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर लक्ष

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर : दि. 03/09/2021

शुक्रवार दि. ०३ सप्टेंबर २०२१ रोजी शिरुर शहरातील अनेक महिलांनी, भारतीय जनता पार्टी मध्ये अधिकृत प्रवेश केला असून, या महिला पूर्वी शीवसेनेत पदाधिकारी होत्या. त्यामुळे भाजप ने शिरूरमध्ये शिवसेनेला धक्का दिल्याचे दिसते आहे. शिवसेनेत शहर संघटक म्हणून काम करत असणाऱ्या महिला पदाधिकारी आणि अनेक भागातील महिलांचा‌ या प्रवेशात समावेश आहे. हा प्रवेश शिरूर हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे पुतणे, व भाजप चे शहराध्यक्ष ‌तसेच नगरसेवक नितीन पाचर्णे, कार्याध्यक्ष मितेश गादिया आणि उपाध्यक्ष ‌निलेश नवले यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष राजु शेख, भाजप उद्योग आघाडी उपाध्यक्षा वर्षा काळे, भाजप ओबिसी मोर्चा चिटणीस अजित डोंगरे, तालुका संघटन सरचिटणीस गोरक्ष काळे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिरूर येथे संपन्न झाला.

प्रवेश‌ केलेल्या महिलांमध्ये :-
अनघा पाठकजी
सिमा मेटे
सुनिता दिवटे
संजना पठारे
मंगल गव्हाणे
लक्ष्मी शिंदे
डिंपल गव्हाणे
या सर्वांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश झाल्याचे नितीनदादा पाचर्णे व मितेशभैय्या गादीया यांनी सांगितले.

यावेळी संघटन सरचिटणीस नवनाथ जाधव, सरचिटणीस विजय ज्ञानेश्वर नर्के, उपाध्यक्षा रेशमा शेख, कामगार आघाडी अध्यक्ष संजय दुबे, युवामोर्चा उपाध्यक्ष शिवम पाठकजी, महिला मोर्चा अध्यक्षा रश्मी क्षिरसागर, सरचिटणीस तृप्ती पंचाभाई, उपाध्यक्षा वैशाली ठुबे, संभाजी रणदिवे, वसंत गव्हाणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हे प्रवेश आगामी नगरपालिका निवडणुका तसेच इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे ठरणार असल्याचे बोलले जात आहे. भाजप आता शिरूर शहरासह तालुक्यात काय काय रणनीती आखतेय याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *