आळेफाट्याच्या सिध्दी पवळे ची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.5/9/2021

राज्यस्तरीय ग्रॅप्लिंग कुस्ती स्पर्धेत ५६ किलो वजनी गटात मिळवला प्रथम क्रमांक

बातमी:- विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर

जुन्नर l वैराग (ता. बार्शी) येथे झालेल्या राज्यस्तरीय ग्रॅप्लिंग कुस्ती स्पर्धेत ५६ किलो वजनी गटात आळेफाटा (ता.जुन्नर) येथील सिद्धी पवळे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्य
ग्रॅप्लिंग कुस्ती संघटनेच्या वतीने वैराग येथे नुकत्याच राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या. सिद्धी हिची दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कुस्ती प्रशिक्षक सुरेश काकडे यांचे सिद्धीस मार्गदर्शन मिळेल.सिद्धी बऱ्याच वर्षांपासून कुस्तीची प्रॅक्टिस करते.तिने या आधी तालुका,जिल्हा विभागीय स्तरावर यश मिळवले आहे. तिने बेल्हे (ता.जुन्नर) येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल या विद्यालयातुन दहावी ची परीक्षा दिली आहे.शाळेचे संस्थापक सीए सावकर गुंजाळ,अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे,विश्वस्त दावला कणसे,सर्व संचालक, प्राचार्या विद्या गाडगे, उपप्राचार्य के.पी.सिंग यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *