ज्या पक्षाचा मुख्यमंत्री त्याचच सरकार,आम्ही काँग्रेस,राष्ट्रवादी च्या वर :- संजय राऊत

बातमी:- विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर

आळेफाटा I शिरुर लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळचा शिवसेनेचा गड आढळराव पाटील यांनी तिथूनच खासदारकीची हॅट्रिक केली. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत चौकार मारण्यापासून त्यांना राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी रोखलं. तसंच विधानसभा निवडणुकीत देखील खेड, जुन्नर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. राज्यात जरी महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मोठी धुसफूस आहे. याच पार्श्वभूमीवर राऊतांचा पुणे-शिरुर दौरा महत्त्वाचा आहे. अपेक्षेप्रमाणे राऊतांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीला इशाऱ्यावर इशारे दिले आहेत. राज्यात जरी तीन पक्षाचे सरकार असलं तरी ज्यांचा मुख्यमंत्री असतो त्यांच सरकार असतं. सरकार आपलं आहे. शिवसेना दोन्ही पक्षांच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी वर आहे. ही आपली पॉवर आहे, असं म्हणत राऊतांनी सेनेची पॉवर दाखवण्याचा प्रयत्न केला.

शिवजन्मभूमीची माती घेऊन गेल्यानेच राम मंदिराच्या कार्याला वेग आला:-संजय राऊत

 

दुसरीकडे शरद पवार आपले आहेत. अजित पवार देखील आपले आहेत. दिलीप वळसे गृहमंत्री असतील, मात्र शिवसेना सगळ्यांच्या वर आहे, असं म्हणत शिरुर लोकसभा मतदारसंघात जाऊन त्यांनी राष्ट्रवादीला डिवचलं. तसंच भाजपला अजूनही शिवसेनेची गरज लागते, असं म्हणत शिवसेनेचं महत्त्व अधोरेकित केलं.तसेच जुन्नर तालुक्यातच देशात व राज्यात असणार महत्व राऊतांनी सांगितले. संजय राऊत त्यांचे आळेफाटा येथे शिवसैनिकांनी उत्साहात स्वागत केले.

शिवसेनेचे गरज सर्व पक्षांना लागते:- संजय राऊत

या प्रसंगी शिवसेना उपनेते रविंद्रजी मिर्लेकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हाप्रमुख माजी आमदार शरद सोनवणे, तालुका प्रमुख, संपर्क प्रमुख दिपमाला बढे, नगराध्यक्ष शाम पांडे, माजी जिल्हा उपप्रमुख संभाजी तांबे, नेताजी डोके, जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव पारखे, बाजार समिती उपसभापती दिलिप डुंबरे, उपनगराध्यक्ष दिपेश परदेशी, दिलिप बामणे, प्रसन्ना डोके, बाळासाहेब पाटे, योगेश पाटे,चंद्रकांत डोके,आनंद रासकर, मंगेश काकडे, तसेच अनेक शिवसैनिक या मेळाव्यासाठी उपस्थित आहेत.

राहुल गांधींनी माझ्याकडुन शिवसेनेची रचना समजून घेतली:- संजय राऊत

या मेळाव्यात भाजपचे नेते सुनिल मेहेर, भाजपच्या महिला आघाडीच्या माजी तालुकाध्यक्ष स्वाती ढोले, दत्तोबा ढोले, मनसे चे तालुका अध्यक्ष दत्ता शिंदे, तसेच इतर भाजप,राष्ट्रवादी, मनसेच्या असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *