पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील गैरव्यवहार व भ्रष्टाचाराची चौकशी करावी मारुती भापकरांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन

चिंचवड

संभाजीनगर येथील श्री गजानन लोकसेवा बँकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला आज (शुक्रवारी) उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार आलेले शहरात आले असताना त्यांना भेटून निवेदन दिले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या गैरव्यवहार व भ्रष्टाचारा बाबत हि महापालिका बरखास्त करा अशी मागणी मी पवार यांच्याकडे केली असता. पवार म्हणाले थेट करता महापालिका बरखास्त करता येणार नाही. तसे केले तर त्याला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते.

मग दादा सन २०१७ पासुनच्या तुमच्याकडे दिलेल्या प्रधानमंत्री आवास योजना, कचरा निविदा, भक्ती-शक्ती उड्डाणपूल, ४२५ रस्ते कामाच्या निविदा, अमृत योजना, स्मार्टसिटीच्या सर्व कामांची उच्चस्तरीय तज्ञ लोकांची समिती नेमून चौकशी करा अशी मागणी दादांना केली असता. होय मी महापालिकेची उच्चस्तरीय चौकशी लावतो असे अजित पवार यांनी आज मला सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *