सन २००१ पासूनचा प्रलंबित पी.एम.पी.एम.एल कर्मचा-यांचा विषय अखेर मार्गी-महापौर सौ.उषा उर्फ माई ढोरे

सन २००१ पासूनचा प्रलंबित पी.एम.पी.एम.एल कर्मचा-यांचा विषय अखेर मार्गी-महापौर सौ.उषा उर्फ माई ढोर

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि ३ सप्टेंबर २०२१
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील १२४ कर्मचारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कायमस्वरुपी आस्थापनेवर घेणेबाबत सातत्याने मागणी करणेत येत होती. आमदार श्री. लक्ष्मण जगताप, श्री. महेश लांडगे यांचेकडूनही याबाबत सुचना पदाधिका-यांना देणेत आलेल्या होत्या. आज स्वारगेट, पुणे येथे झालेल्या पी.एम.पी.एम.एल संचालक मंडळाच्या बैठकीत पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील १२४ कर्मचा-यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कायमस्वरुपी वर्ग करणेस तसेच सदर कर्मचारी सेवेतून सेवानिवृत्त झालेनंतर त्यांना सेवानिवृत्तीनंतरच्या असणा-या सर्व देय रकमा ग्रॅच्युटी, रजा वतेन, प्रॉव्हिडंट फंड इत्यादी रकमा पी.एम.पी.एम.एल ला प्राप्त होणा-या संचलन तुटीतून अदा करणेस अखेर मान्यता मिळाली. यासाठी महापौर सौ.उषा उर्फ माई ढोरे, स्थायी समिती सभापती अड. नितीन लांडगे यांनी विशेष प्रयत्न केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून पुणे महानगर परिवहन महामंडळाला संचलन

तुट दिली जाते. तसेच पूर्व पी.सी.एम.टी. कर्मचा-यांना येण्या-जाण्यास लागणारा वेळ याचा विचार करुन महापौर माई ढोरे यांनी बैठकीत १२४ कर्मचा-यांना महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कायमस्वरुपी वर्ग करणेसंबंधी आग्रही भुमिका घेतल्याने आज कर्मचा-यांचे कायमस्वरुपी वर्ग करण्यास अखेर मान्यता मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *