अखेर अक्षय बो-हाडे याचे क्रूर कर्म आले समोर…पत्नींनेच केला क्रूर कर्माबद्ल मोठा खुलासा

अक्षय ची पत्नींने अक्षय च्या क्रूर कर्मा बद्ल मोठा खुलासा करत जुन्नर पोलिसात फिर्याद दिली आहे..

 

जुन्नर:किरण वाजगे,कार्यकारी संपादक

शिवभक्त म्हणून अक्षय बो-हाडे यांने मनोरुग्णांची सेवा करत असल्याचे अनेकवेळा फेसबूक Live केल्याचे आपण पाहिले आहे त्याच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची दखल अनेक सामाजिक संस्थांनी घेत त्याला अनेक पुरस्कार ही दिले आहे मात्र आज हा अक्षय बो-हाडे क्रूर कर्म करणारा असल्याचे समोर आले आहे…

अक्षय बो-हाडे याच्या पत्नीने त्याच्या क्रूर कृत्याची खरी कहाणी सांगितली आहे…

मनोरुग्णांचा सांभाळ हा अक्षय चा फक्त धंदा होता तो त्यांना मारहाण करीत होता तसेच अक्षय ने मी गरोदर असताना मलाही अनेक वेळा मारहाण केली असल्याचा खुलासा खुद्द अक्षय बो-हाडे याच्या पत्नीने जुन्नर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत केला आहे…

जुन्नर शहरातील माजी नगरसेवकाला खंडणी मागितल्या प्रकरणी अक्षय बो-हाडे याला जुन्नर पोलीसांनी अटक केली आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *