अनेक राज्यांत घरफोड्या करणारी टोळी, स्वतःला रॉबिन हूड म्हणवून घेणाऱ्या टोळी प्रमुखासह, पुणे LCB च्या ताब्यात

विभागीय संपादक रवींद्र खुडे

शिरूर शहरात दिनांक 16 ऑगस्ट 2021 रोजी, आदिनाथनगर या ठिकाणी राहणारे संतोष शेवाळे, यांचे कुटुंब वैयक्तिक कामानिमित्त त्यांचे राहते घर कुलूप बंद करून बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी, दिवसा दुपारचे वेळी शेवाळे यांचे घराचे कुलूप तोडून घरफोडी चोरी केली होती. त्यात एकूण दहा लाख पंधरा हजार रुपयांचे एकोणतीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी गेले होते. याबाबत संगीता संतोष शेवाळे यांनी शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला होता.
पोलीस निरीक्षक अशोक शेळके (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण) यांनी या बाबत तपास हाती घेत हा गुन्हा उघड केला आहे. त्यांच्या पथकाने चोरट्यांची माहिती घेत असताना, सदरची घरफोडी चोरी ही आंतरराज्यात सक्रिय असलेल्या टोळीने केली असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने तपास पथकाला योग्य मार्गदर्शन करून कारवाई करण्याबाबत सांगितले होते.
त्यानुसार सदरचा गुन्हा हा किशोर तेजराज वायाळ, रा. मेरा खु ll ता. चिखली, जी. बुलढाणा याच्या टोळीने केला असल्याची बातमी मिळाली होती. हाच धागादोरा पकडत, या टोळीची माहिती काढत असताना, टोळीचा म्होरक्या हा त्याच्या साथीदारासह शिरूर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्याने, त्यांना दिनांक 30/8/2021 रोजी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलेय. ताब्यात घेतलेल्यांची नावे :-
1) किशोर तेजराज वायाळ, वय 45 वर्ष, रा. मेरा बुद्रुक, तालुका चिखली, जी. बुलढाणा.
2) गोरख रघुनाथ खांडेकर, वय 34 वर्ष, रा. जालना असे समजले.
या दोघांकडे पोलीसांनी तपास करता, त्यांनी शिरूर येथील घरफोडी चोरीचा गुन्हा केल्याचे कबूल केले. तसेच गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल हा संशयित आरोपी
3) सचिन जगन्नाथ शहाणे, वय 35 वर्ष, रा. औरंगाबाद.
याला मालाची माहिती देऊन, त्याच्या मार्फत मालाची विक्री तसेच विल्हेवाट करून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.
या तिघांनाही मेडिकल तपासणी करून घेऊन, शिरूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
यातील आरोपी नामे किशोर तेजराज वायाळ याने त्याचे साथीदाराच्या मदतीने खालील प्रमाणे चालू घरफोडीचे गुन्हे केले आहेत :-

1) नंदुरबार शहर पो स्टे गु र नं 624/2021 IPC 454, 380
2) शहादा पो स्टे नंदुरबार गु र नं 779/2021 IPC 454, 380
3) शहादा पो स्टे नंदुरबार गु र नं 780/2021 IPC 454, 380
4) शहादा पो स्टे नंदुरबार गु र नं 781/2021 IPC 454, 380
5) शहादा पो स्टे नंदुरबार गु र नं 813/2021 IPC 454, 380

तसेच त्याच्यावर यापूर्वी गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यात घरफोडीचे 50 हुन अधिक गुन्हे दाखल आहेत.
यातील आरोपी नामे किशोर तेजराज वायाळ हा घरफोडी सराईत गुन्हेगार असून, तो जेलमध्ये गेल्यानंतर नवीन गुन्हेगारांची ओळख करून घेऊन, टोळी तयार करत असे. टोळीमध्ये त्याला मामा या नावाने ओळखले जात होते. तो चोरीच्या रकमेतून त्याच्या राहत्या मूळ गावात सामाजिक कार्यात आर्थिक सहकार्य करत असे. तसेच गरजूंना आर्थिक मदत करत असे व स्वतःला गावाचा रॉबिन हूड असल्याचे सांगत असे.

ही आंतरराज्यीय घरफोडी करणारी टोळी पकडण्याची सदरची कारवाई, ही पुण्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, दौंडचे उपविभागीय पोलीस अधीकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली, पुणे LCB प्रमुख पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सपोनि सचिन काळे, सहा फौजदार तुषार पंधारे, पो. हवा. जनार्धन शेळके, पो. हवा. राजु मोमीन, पो. हवा. अजित भुजबळ, पो. ना. मंगेश थिगळे, पो. कॉ. अक्षय जावळे, पो. कॉ. दगडू वीरकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *