चाळकवाडी टोल नाका पुन्हा सुरू, वाहनचालकांत उदासीनता…

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.1/9/2021

चाळकवाडी टोल नाका पुन्हा सुरू, वाहनचालकांत उदासीनता

बातमी:-विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर

जुन्नर lचाळकवाडी येथील टोल नाका बुधवार (दि.१) सकाळी आठ वाजता सुरू करण्यात आला असल्याने वाह
पुणे – नाशिक महामार्गावर खेड, चाळकवाडी तसेच अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर या ठिकाणी टोल नाका असुन यापैकी जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी या ठिकाणचा टोल नाका बंद होता. तो बुधवारी सकाळी आठ वाजता सुरू करण्यात आला आहे. या महामार्गाचे काम अर्पुण असताणा देखील टोल चालु करण्यात आला असुन काही दिवसांपूर्वी येथील टोलनाका बंद करण्यासाठी गेलेले असताणा जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांच्यासह शंभर कार्यकर्त्यांवर कोव्हीडचे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
दरम्यान पुणे – नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर हा टोल (दि.१ मे) रोजी चालु करण्यात येणार होता. परंतु शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांणी महामार्गाची कामे अर्धवट असताना हा टोलनाका सुरू केला जाणार होता. यासंदर्भात पत्र पुणे नाशिक महामार्गाचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडिया) मुख्य महाव्यवस्थापक राजीव सिंह आणि प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांना दिलेले होते. तसेच तालुक्याचे आमदार अतुल बेनके व माजी आमदार शरद सोनवणे व युवा नेते या रस्त्याचे काम पुर्ण होत नाही तोपर्यंत टोल चालु करू देणार नाही असे सांगीतले व हा चालु करण्यात येणारा टोल तेव्हा बंद केला होता.परंतु पुन्हा पाच महीण्यांनंतर हा टोल नाका महामार्गाचे काम अर्पुण असताना देखील चालु करण्यात आला आहे. या महामार्गावरील आळेफाटा या ठिकाणचे बायपास तसेच पिंपळवंडी गावाजवळचे पुलाचे तसेच इतर ठिकाणची काम झालेले नसताना देखील हा टोल चालु करण्यात आलेला आहे. याबद्दल प्रवाशांणी नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *