
आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.1/9/2021
यादववाडीत विहिरीत आढळला तरुणीचा मृतदेह
बातमी:-विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर
बेल्हे:- येथील यादववाडी (ता.जुन्नर) वस्तीवरील या ठिकाणी एका तरुणीचा मृतदेह विहीरीत आढळून आला असून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशन कडुन मिळालेल्या माहितीनुसार यादववाडी वस्तीवर रहात असलेले दत्तात्रय पिंगळे बुधवार (दि.१) रोजी पहाटेच्या सुमारास उठले असता त्यांना त्यांची मुलगी प्राची दत्तात्रय पिंगळे (वय २१) हि घरात दिसून आली नाही. बाहेर इतर ठिकाणी शोधाशोध सुरू केली. परंतु त्यांना मुलगी भेटली नसल्याने घराजवळच काही फुटाच्या अंतरावर असलेल्या विहिरीजवळ जाऊन पाहीले तर त्यांना विहीरीत चप्पल तरंगताना दिसली. संशय आल्याने त्यांनी याबाबत पोलीस स्टेशन ला कळवले. घटनास्थळी पोलीसांनी भेट दिल्यावर त्या विहीरीत मृतदेह आढळला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्या तरुणीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. पोलीसांनी आकस्मिक मुत्यू म्हणुन नोंद केली आहे. पुढील तपास आळेफाटा पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमीत पोळ हे करत आहे.