क्रीडा दिनाचे औचित्य साधून भारतीय समतावादी पार्टी पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या वतीने

महात्मा बसवेश्वर क्रीडा गौरव पुरस्कार शहरातील खेळाडू, क्रीडा शिक्षकांना प्रदान

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि ३०ऑगस्ट २०२१


राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षक शिक्षिका व खेळाडू यांचा मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन पक्षाच्या वतीने गौरव करण्यात आला . या वर्षीपासून सुरू केलेल्या क्रीडा पुरस्काराचे प्रदान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा दिलीप पांढरकर, प्रमुख पाहुणे मा फिरोज शेख, मा राज पाटील, मा सूर्यकांत मुळे, मा निवृत्ती काळभोर, मा गणेश मगर, मा भुजंग दुधाळे ईत्यादी उपस्थित होते
मा फिरोज शेख सरांनी क्रीडा शिक्षकाला खेळाडू घडविताना किती परीश्रम घ्यावे लागतात यावर प्रकाश टाकुन विजेत्यांचे अभिनंदन केले, मा सूर्यकांत मुळे सरांनी निरोगी आयुष्या साठी खेळाचे किती महत्त्व आहे याबद्दल मनोगत व्यक्त केले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्री बसवराज कनजे यानी सत्कार करण्यामागील उद्देश हा मेहनती क्रीडापटुंचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देणे हा आहे असे सांगितले
विशेष बाब म्हणजे यावेळी क्रांती दिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरामधे सहभागी झालेल्या रक्तमित्रांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शहरातील शिक्षकांचा व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला
पुरस्कार विजेते
1) निलखंड काबळे 2) सिमा चव्हाण
3) यश जाधव 4) प्रशांत रणखांबे
5) स्नेहा कुदंप 6) ऋचा पाचपांडे
7) बाळासाहेब हेगडे 8) उमा काळे
9) ईश्वरी फपाळ10) गजानन आळगड्डे11) रेणू शर्मा 12) सुष्टी सरमाने13) निखिल पवार
14) संपदा कुंजीर 15) स्तुती हुद्रे
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी श्री अनंत सिंदाळकर, श्री विलास शेटकार, श्री सिध्दु नावदगेरे, संगमेश्वर शिवपुजे, चंद्रकांत खोचरे, अभिजित हांचे, शिवानंद घाटके आणि शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळाचे श्री कदम, श्री माळी राजकुमार, हर्षदा नळकांडे, मनिषा पाटील,

कार्यकमाचे सूत्र संचलन श्री महादेव फपाळ व सौ सुनिता नगरकर यांनी केले तसेच सुधाकर कुंभार यानी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *