साहित्य आणि पुस्तकांचे लोकार्पण; शाहू, फुले, आंबेडकर ग्रामअभ्यासिकेला ०१ लाखाची मदत…

दिनांक : २८ ऑगस्ट २०२१
प्रतिनिधी : अक्षता कान्हुरकर, राजगुरुनगर

शेलपिपंळगाव मधील शाहू, फुले, आंबेडकर ग्रामअभ्यासिकेला रॉटरॅक्ट क्लब ऑफ औंध यांच्या माध्यमातून व कु. श्रीनाथ लांडे यांच्या पाठपुराव्यातून अभ्यासिकेला एक लाख रुपये किमतीची पुस्तके व साहित्य विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी उपलब्ध करून लोकार्पण करण्यात आले.


                    ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शासनाच्या प्रत्येक विभागातील पदभरती युपीएसी, एमपीएससी, स्टाफ सिलेक्शन, बँकिंग व पोलीस भरती या स्पर्धा परीक्षांची व्यवस्थितपणे तयारी करता यावी यासाठी विद्यार्थांना रॉटरॅक्ट क्लब औंध यांच्या वतीने साहित्य देण्यात आले.


                    या वेळी खेड चे माजी आमदार कै. सुरेशभाऊ गोरे यांचे बंधु नितीन गोरे, रॉटरॅक्ट क्लब औंधचे अध्यक्ष कु. प्रतिक कालगुटकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख बाप्पु थिटे, युवासेना उपतालुकाप्रमुख विशाल पोतले, उपसरपंच गणेश दौंडकर, वाहतूकसेना उपतालुकाप्रमुख अमोल इंगळे, सोसायटीचे संचालक रोहिदास दौंडकर, पंकज गायकवाड, मच्छिंद्र दिघे, प्रविण तांबे, प्रसाद अल्हाट, विकास कोळेकर, रोटरी क्लब सदस्य कु. हमिद शेख, रितिका हस्टे, नितु कोरंगा, आदित्य साळी, तनिष्का जाधव, सिद्धार्थ पांडे, सौरभ देशमुख, उत्कर्ष कोल्हे, सौरभ वाडकर, सुशांत बिंदल, विनिता राटा, पराग साळुंखे, देव गुप्ता, देवेंद्र देशमुख, देवयानी देशमुख, संस्कृती देशमुख, तेजल शिंदे, वैभव कराळे, किरण बोधे, सिद्धार्थ थिटे, अनिकेत दौंडकर, आकाश दौंडकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *