दोंदेतील वरिष्ठ शिक्षकाला अटकपूर्व जामीन मंजूर…

राजगुरूनगर प्रतिनिधी,अक्षता कान्हुरकर
दिनांक २७/८/२०२१

राजगुरुनगर दोंदे (ता.खेड) येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयातील वरिष्ठ शिक्षकाला बुधवार (दि.25) राजगुरुनगर जिल्हा अतिरिक्त न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर झाला,

संबंधित शिक्षकांने शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्यावरून त्याच्याविरोधात दहा जुलैला संस्थेने पत्र देऊन चौकशी व कारवाईची मागणी खेड पोलिस ठाण्यात केली होती, 21 जुलैला शाळेतील कर्मचाऱ्याने पोलिसांत तक्रार दिली व गुन्हा नोंदविण्यात आला होता, मात्र हे सर्व प्रकरण शिक्षक कार्यरत असलेल्या संस्थेचे अध्यक्ष ,बाजार समितीचे माजी उपसभापती सदाशिव कोहिंनकर ,व सहकार्यानी कट रचून केले. असा कोणताही प्रकार प्रत्यक्षात घडला नव्हता ,पीडित विद्यार्थिनी, पालकांची तक्रार नव्हती ,तसेच पोलिस व न्यायालयात जबाब देण्यात आले म्हणून शिक्षकांची नाहक बदनामी झाली, बनावामुळे शिक्षक असलेल्या व्यक्तीसह परिवाराला मनस्ताप सहन करावा लागला, असा युक्तिवाद वरिष्ठ शिक्षकाचे वकील ॲड,निलेश आंधळे यांनी केला, तो ग्राह्य धरून न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *