केंद्रीय मंत्री नारायण राणेंना महाराष्ट्र सरकारने अटक केल्याने, शिरूर भाजप ने ठाकरे सरकारचा केला निषेध…

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
शिरूर : दि. 25/08/2021

       “केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना, मशाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारने सूडबुद्धीने अटक केली असून, आम्ही या सरकारचा निषेध करतोय’ अशा शब्दांत आपली मते व्यक्त करत, नारायण राणेंच्या या अटकेच्या निषेधार्थ व राज्यसरकार विरोधात, शिरुर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. मंगळवार दि. २४ ऑगस्ट २०२१ रोजी संध्याकाळी, शिरूर येथे ही निदर्शने करण्यात आली.
        यावेळेस, भाजपा शहराध्यक्ष व शिरूर नगरपालिकेचे नगरसेवक नितीन पाचर्णे, कार्याध्यक्ष मितेश गादिया, सरचिटणीस विजय ज्ञानेश्वर नर्के, संभाजी रणदिवे, निलेश नवले, रेशमा शेख, अल्पसंख्यांक अध्यक्ष हुसेन शाह, महिला मोर्चा अध्यक्षा रश्मी क्षीरसागर, वैशाली ठुबे, तृप्ती पंचभाई, अनघा पाठकजी, कौस्तुभ उबाळे, शिवम पाठकजी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *