कै. बबन लक्ष्मण पवार यांचे हृदय विकाराच्या तीव्र धक्याने दुःखद निधन…

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
पिंपळगाव माळवी / नगर : दि. 20/08/2021.

पिंपळगाव माळवी येथील जुने बांधकाम ठेकेदार कै. बबन लक्ष्मण पवार, यांचे नुकतेच हृदय विकाराच्या तीव्र धक्याने दुःखद निधन झालेय. त्यांच्या पछ्यात तीन मुले, राजेंद्र पवार, प्रशांत पवार व HDFC बँकेच्या जीवन विमा विभाग, पुणे येथे ऍशुरन्स मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले किशोर पवार, तसेच पत्नी आशाबाई, बहिणी, भाऊ, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
मनमिळावू स्वभाव म्हणून सर्व पंचक्रोशीत ओळख असलेले कै. बबन पवार, यांनी गेली काही वर्षांपासून बांधकाम व्यवसाय सोडून, शेती व पशुपालन व्यवसाय नेटक्या पद्धतीने करत असतानाच, अचानक त्यांना हृदय विकाराचा तीव्र धक्का बसल्याने त्यांची प्राणज्योत माळवली. त्यामुळे पवार कुटुंबीय व नातलगांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
दरम्यान त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी, काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक नामदेवराव चांदणे, पुणे येथील HDFC बँक मॅनेजर प्रसाद सांबारे, डेप्युटी मॅनेजर मेहुल विठलानी, डेप्युटी मॅनेजर चिन्मय भागडे, ब्रँच मॅनेजर अमरितो कार, तसेच मायक्रोटेक लिमिटेड कंपनी, अहमदनगर चे प्लांट हेड किरण देवीकर, परचेस हेड गणेश घाडगे, प्रॉडक्शन हेड महेश कुर्हे, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी भेट देत व काही लोकप्रतिनिधींनी फोनवरून संपर्क करून पवार कुटुंबियांचे सांत्वन केलेय.
आपला आवाज परिवाराकडूनही कै. बबन लक्ष्मण पवार यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *