कोरोणाचे सावट असल्याकारणाने ओझर येथील विद्यालयात साध्या पद्धतीने ध्वजारोहण संपन्न…

ओझर प्रतिनिधी: मंगेश शेळके

दि. १५ ऑगस्ट २०२१(ओझर): सध्या देशामध्ये कोरोणाचे सावट असल्याकारणाने ओझर येथील श्री विघ्नहर विद्यालयात भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन अतिशय साध्या पद्धतीने व ठराविक ग्रामस्थ ,विद्यार्थी ,शिक्षक विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी तरुण वर्ग , ओझर नंबर १ , व २ चे सरपंच ,उपसरपंच ,महिला पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अतिशय साध्या पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला .विघ्नहर देवस्थानचे खजिनदार किशोर भाऊ कवडे यांच्या हस्ते ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

तदनंतर सर्वांनी ध्वजाला सलामी देत विद्यालयातील विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत सादर केले. नंतर विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” अशा घोषणा या ठिकाणी दिल्या. विशेष बाब म्हणजे प्रथमत:च विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत हा भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन संपन्न झाला .

त्यामुळे ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर काहीतरी हरवल्यासारखे याठिकाणी जाणवत होते .प्रथमतः ओझर नंबर 2 येथील ग्रामपंचायत ,ओझर हायस्कूल व शेवटी नंतर ओझर नंबर 1 या ठिकाणी अतिशय साध्या पद्धतीने ध्वजारोहण करण्यात आले.ठराविक ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात व साध्या पद्धतीने ओझर या ठिकाणी संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *